Headlines

अभिनंदन ! अभिनेत्री मृणाल दुसानिसने घेतली नवीन कार, कारसोबत केला खास फोटो शेअर !

मराठी मालिकांमधून अनेक नवोदित कलाकार आपल्याला भेटीला येतात आणि त्यापैकी काही कलाकार त्यांच्या अभिनय कौशल्याने आपल्या मनात घर करून जातात. अशा कलाकारांना अभिनय करताना पाहणं म्हणजे एक पर्वणीच असते. अशीच एक अभिनेत्री आहे मृणाल दुसानिस. जिच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

मृणालने अनेक विविध मराठी वाहिन्यांवरील मालिकांमध्ये मुख्य भूमिकेचे पात्र साकारत काम केले आहे. तिने एकता कपूरच्या “माझिया प्रियाला प्रीत कळेना” या झी मराठीवरील गाजलेल्या मालिकेमधून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर “तू तिथे मी” या मालिकेत मंजिरी ही मुख्य स्त्री भूमिका तिने साकारली. त्यानंतर कलर्स मराठीवरील “असं सासर सुरेख बाई” आणि “हे मन बावरे” या मालिकांमध्ये देखील तिने मुख्य स्त्री पात्र साकारले आहे. तिची अभिनयाची सहजता आणि तिचा निरागसपणा प्रेक्षकांचे मन मोहवतो. या व्यतिरिक्त ती कथाबाह्य कार्यक्रमाचा देखील भाग झाली आहे. तिच्या वरील मालिकांमधील अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

मृणालचा जन्म २० जून १९८८ मध्ये नाशिक येथे झाला. नाशिकमध्ये शिक्षण घेत तिने पत्रकारितेमध्ये पदवी संपादन केली. मृणालने नीरज मोरे पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या मुलासोबत २०१६ मध्ये लग्न केले. हे जोडपं एकत्र अगदी सुंदर दिसतं. चाहते देखील या जोडीचे फोटो सोशल मीडिया वर शेयर करत आणि लाईक करत असतात.

या लाडक्या जोडप्याने मर्सिडीज बेंज ही आलिशान नवी कोरी कार विकत घेतली आहे. मर्सिडीज बेंज कारच्या किमती साधारणतः ४१ लाखांपासून पुढे आहेत. ही नवी कार घेतल्याचा फोटो मृणालचा पती नीरज मोरे याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात नीरज आणि मृणालचा कारसोबतचा फोटो आहे. मृणाल कारचं स्टेरिंग पकडून बसल्याचा फोटो आहे. खाली कॅप्शनमध्ये लिहलं आहे, “With the right companion by your side, every trip brings a happy memory” आणि पुढे हॅशटॅग वापरत मृणालला टॅग केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neeraj (@neeraj.more14)


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !