Headlines

पठाण फेम शाहरुखचे कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाचे खास कनेक्शन, एका रूमचे भाडे तब्बल … !

हो नाही हो नाही म्हणता म्हणता बॉलिवूड अभिनेत्री कियाका अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा बोहल्यावर चढणार आहे. गेली कित्येक दिवस हे कपल चर्चेत होते. सार्वजनिक ठिकाणी, कार्यक्रमांमध्ये अनेकदा ते एकत्रच दिसायचे. पण त्यांनी कधीच आपले नाते अधिकृत मान्य केले नव्हते.

पण आता त्यांच्याकडे त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यांच्याही लग्नात गोपनियता पाळण्यात येणार आहे. पण सूत्रांकडून कोणती ना कोणती माहिती मीडियाला मिळत असते. पण सिद्धार्थ कियाराच्या लग्नाशी शाहरुख खानचा देखील संबंध असल्याचे बोलले जात आहे.

शाहरुखचा माजी बॉडीगार्ड पाहणार सिक्योरिटी सिद्धार्थ आणि कियारासंबंधी रोज नवी माहिती समोर येत आहे. अशातच आता या जोडप्याच्या लग्नाची शाहरुख खानचा देखील संबंध असल्याचे बोलले जात आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची सिक्युरिटी अरेंजमेंट किंग खानचा माजी बॉडीगार्ड पाहत आहे. लग्नाची जय्यत तयारी सुरू असून ती सर्व किंग खानच्या बॉडीगार्डच्या देखरेखीखाली होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार करण जोहर, मनीष मल्होत्रा, शाहिद कपूर ,मीरा राजपूत , वरून धवन यांसारखे अनेक मोठे सेलिब्रेटी या लग्न सोहळ्यासाठी जैसलमेरला रवाना होणार आहेत. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी राजेशाही थाट केला आहे. लग्नात डेझर्ट सफारी पासून स्पापर्यंतच्या सोयी सुविधा उपलब्ध असतील.

मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ कियारा यांच्या लग्नाचे विधी पाच फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. पाच तारखेला संगीताचा कार्यक्रम असेल तर सहा तारखेला सप्तपदी आणि सात तारखेला रिसेप्शन असेल. सिद्धार्थ आणि कियाराने आपल्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेस मध्ये ८४ रूम बुक केले आहेत.

या पॅलेसच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार तेथील एका रूमचे एका दिवसाचे भाडे 24 हजार पासून ते 76 हजार रुपयांपर्यंत आहे. तर पॅलेस मधील सर्वात महागडी आणि आलिशान रूम एका रात्रीसाठी एक लाख तीस हजार रुपयांना दिली जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !