Headlines

अजय देवगनच्या ऑनस्क्रीन मुलाने “या” सुंदर अभिनेत्रीशी केले लग्न, फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क !!

बॉलीवूड आणि टेलिव्हिजन जगतामध्ये ज्या काही घटना घडतात, त्याची इतं भूत माहिती प्रत्येकाला हवी असते. प्रत्येक जण या बॉलीवूड विश्वामध्ये काय घडते याचा ठावठिकाणा देखील घेत असतो. आपल्यापैकी अनेक जण एक वेळ उपाशी राहतील परंतु सिरीयल किंवा बॉलीवूड मध्ये काय घडत आहे हे जाणून घेणे पसंत करत असतात. आपल्यापैकी अनेकांनी तारक मेहता का उल्टा चश्मा ही सिरीयल पाहिली असेल.

या सिरीयल मध्ये घडणाऱ्या अनेक घडामोडी अनेकांच्या तोंड पाठ देखील असतील. तसेच आज आम्ही तुम्हाला एका अशा सुंदर अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्या अभिनेत्याने आतापर्यंत फक्त एक ते दोन चित्रपटात काम केलेले आहे परंतु त्यानंतर त्याने टेलिव्हिजन जगतामध्ये काम करायला सुरुवात केली. सुंदर दिसण्याच्या शैलीमुळे आज ही हा अभिनेता अनेकांच्या हृदयावर राज्य करत आहे.

अनेकदा बॉलीवूडमध्ये सोबत काम करत असताना आपल्याला माहिती आहे की एकच काम करत असताना प्रेम देखील होते आणि खूपच कमी वेळा प्रेमाचे रूपांतर लग्नामध्ये देखील झालेले पाहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जोडी बद्दल सांगणार आहोत, ज्यांचे सुरुवातीला प्रेम होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न देखील केले. या अभिनेत्याची चर्चा सगळीकडे जोरात होत आहे.

या अभिनेत्याने 2004 मध्ये “टार्जन द वंडर कार” या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूड क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाचे प्रमुख वैशिष्ट्य काय होते की,बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच एका गाडीवर चित्रपट बनवण्यात आला होता आणि हा चित्रपट प्रचंड प्रमाणात गाजला देखील होता. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाबद्दल माहिती न सांगता या चित्रपटात काम केलेल्या अभिनेता म्हणजे वत्सल सेट व त्याच्या पत्नी बद्दल सांगणार आहोत.

या दोघांची जोडी हल्ली खूपच प्रसिद्ध आहे. एकेकाळी अजय देवगन च्या मुलाची भूमिका वत्सल ने साकारली होती. चित्रपट करिअरमध्ये फारसं यश न मिळाल्याने वत्सल ने टेलिव्हिजन सिरीयल मध्ये काम करायला सुरुवात केली. सध्या वस्तल लाईफ ओके वरील “रिश्तो का सौदागर – बाजीगर” मध्ये काम करत आहे. अभिनेत्री इशिका दत्ताने देखील दृश्यम या चित्रपटांमध्ये अजय देवगन च्या मुलीचे काम केले होते. वत्सल आणि इशिका हे दोघेही पती-पत्नी आहेत. इशिकाच्या सौंदर्याची चर्चा आजही बॉलीवूड विश्वामध्ये केली जाते.

एका रिपोर्टनुसार वत्सल आणि इशिका गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. सुरुवातीला ते एकमेकांना भेटू लागले आणि त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले व प्रेमाचे रूपांतर त्यांनी लग्नामध्ये केले. आज दोघे ही आपला संसार अगदी आनंदाने करत आहेत. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. वत्सल आणि इशिका दोघे ही एकमेकांवर खूप प्रेम करतात.