Headlines

मलायका आणि अरबाज खानच्या लग्नात अर्जून कपूर होता दूध पिता बच्चा, पण आता … पहा त्याचा त्यावेळेसचा फोटो !

एके काळी आदर्श जोडपे अशी ओळख असलेल्या मलायका आणि अरबाज खान यांची जोडी आता एकसाथ नाही. पण त्यांच्या लव्ह स्टोरीच्या चर्चा आजदेखील होत असतात. दोघांची प्रेम कहाणी खूपच फिल्मी होती. असे म्हणतात की दोघे पहिल्या भेटीतच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तेव्हा या दोघांची भेट एका कॉफी जाहिरातीच्या शूटिंग वेळी झालेली. या जाहिरातीच्या शूटिंगनंतर मलायका आणि अरबाज रिलेशनमध्ये आलेले.

दोघांनी एकमेकांना ५ वर्षे डेट केले. खूप काळ एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी लग्न केले. १९९८ मध्ये अरबाज आणि मलायका यांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. त्यानंतर २००२ मध्ये त्यांना मुलगा झाला. दोघांचा संसार १५ वर्षे मस्त चालू होता. पण त्यानंतर दोघांमधील दुरावा येण्यास सुरुवात झाली. आणि त्या दुराव्याचे प्रमाण इतके वाढले की गोष्टी अगदी घ’ट’स्फो’टा’प’र्यंत गेल्या. २०१७ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

आपल्या घ’ट’स्फो’टा’संबंधी मलायका म्हणते की, असा निर्णय घेणे सोपे नव्हते. आम्ही अशा नात्यात होतो जिथे दोघेही आनंदी नव्हतो. त्याचा परिणाम आमच्या मुलाच्या आयुष्यावरही होत होता. घ’ट’स्फो’टा’नंतर मात्र दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहे.


मलायका आणि अरबाजच्या घ’ट’स्फो’टा’ला पाच वर्षे उलटली असली तरी त्यांनी अजूनही दुसरे लग्न केलेले नाही. सध्या अरबाज आपल्याहून २२ वर्षांनी लहान असलेल्या मॉडल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. तर मलायका आपल्याहून १२ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेता अर्जून कपूरला डेट करत आहे.

मलायका आणि अर्जुन त्यांच्या लव्ह लाइफमुळे बरेचदा चर्चेत असतात. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या मलायका आणि अर्जूनची जोडी बॉलिवूडमधील बहुचर्चित जोड्यांपैकी एक बनली आहे. त्यांच्या रिलेशलनच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी आपले नाते लपवण्याचा खूप प्रयत्न केला होता मात्र तो असफल ठरला. आता मात्र ते खुलेआम एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. तर अरबाज आणि मॉडल जॉर्जिया एंड्रियानीसुद्धा अनेकदा एकत्र दिसले आहेत.

सध्या सोशल मीडियावर अर्जुन कपूरच्या बालपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे. असे म्हणतात की हा अर्जुनचा हा फोटो मलायका आणि अरबाजच्या लग्नातला आहे. तेव्हा तो १०-११ वर्षांचा होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !