Headlines

15 हजार कोटींच्या घरात राहतात अंबानी परिवार, एंटिलिया मध्ये आहेत ह्या 8 वस्तू जे घराला बनवतात आलिशान !

जेव्हा आपण देशातील आणि विश्वातील श्रीमंत व्यक्तींच्या उल्लेख करत असतो तेव्हा अशावेळी मुकेश अंबानी यांचे नाव आवर्जून घेतले जाते. अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज प्रमुख म्हणून आपल्या सर्वांना मुकेश अंबानी माहिती आहेत. आजच्या घडीला मुकेश अंबानी यांच्याकडे सर्व सुख सुविधा उपलब्ध आहेत.

अंबानी यांनी आपले वडील दिवंगत धीरूभाई अंबानी यांच्या वारसा पुढे नेलेला आहे आणि आजच्या घडीला संपत्तीमध्ये देखील प्रचंड प्रमाणात वाढ केलेली आहे. वडिलांचा बिजनेस आज नावारूपाला आणलेला आहे म्हणूनच जगामध्ये मुकेश अंबानी यांचे नाव अगदी मानाने घेतले जाते.मुकेश अंबानी यांनी स्वतःच्या मेहनतीवर व हुशार बुद्धीवर आपल्या बिजनेस वाढवलेला आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुकेश अंबानी यांनी पाऊल ठेवलेले आहे आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध केलेले आहे.

मुकेश अंबानी यांच्याकडे अपार संपत्ती आहे. मुकेश अंबानी आपल्या कुटुंबीयांसोबत मुंबईतील एका आलिशान घरामध्ये राहतात. हे घर साधेसुधे नाही तर अक्षरशः बंगला आहे. ही इमारत 27 मजलाची आहे. या इमारतच कौतुक करायचे झाल्यास या इमारतीसमोर मोठे मोठे बंगले देखील फिके पडतात.

अंबानी यांचे घर आलिशान आणि खूपच सुंदर आहे. मुकेश अंबानी यांचे घर जगातील सर्वात महागडे समजले जाणारे लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येते. अंबानी यांच्या घराचे नाव एंटीलिया आहे. हे घर अनेक सुख सोयींनी उपयुक्त आहे तसेच आज आम्ही तुम्हाला या घरासंबंधीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे या गोष्टी या घराचे वेगळेपण आपल्याला सांगते.

मुकेश अंबानी यांच्या घराचे नाव एंटीलिया आहे. या घराचा पाया 2006 मध्ये खणला गेला होता आणि हे घर बांधायला एकूण चार वर्ष लागले होते. अंबानी कुटुंब 2010 पासून या आलिशान घरामध्ये राहत आहे. अंबानी यांच्या घराच्या निर्मिती करिता अनेक विदेशी वास्तू कलांचा वापर केला गेला आहे.

या घरांमध्ये अनेक लक्झरी सुविधा आहेत. या घरात एक सलून, बॉलरूम, स्विमिंग पूल, डान्स स्टुडिओ, आईस्क्रीम पार्लर, मोठी पार्किंग क्षेत्र, तीन हेली पॅड आणि व्यक्तिगत संपत्ती देखील आहे. ‘या घरामध्ये एक पार्किंग एरिया आहे जेथे एका सोबत 168 कार तुम्ही पार्किंग करू शकता इतकी प्रचंड जागा या पार्किंग एरियामध्ये आहे.

या बंगल्यामध्ये म्हणजेच इमारतीमध्ये पार्किंग लॉट सहाव्या माळ्यावर आहे, त्याचबरोबर कारच्या दुरुस्तीसाठी सातव्या माळ्यावर एक कार सर्विस स्टेशन देखील बनवण्यात आलेले आहे. या सर्विस स्टेशन मध्ये गाड्यांची सर्विसिंग केली जाते. अंबानी यांच्या घरामध्ये 600 नोकरांची टीम काम करते तसेच सर्व नोकऱ्यांना लाखो रुपये इतका पगार देखील आहे. असे म्हटले जाते की, अंबानी यांच्या घरी काम करणाऱ्या नोकऱ्यांची सुरुवातीचा पगार हा दोन लाख रुपये इतका आहे.

‘एंटीलिया’ मध्ये 9 हाय स्पीड लिफ्ट आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराची इमारत 27 माळ्यांची आहे म्हणूनच या घरामध्ये जी लिफ्ट आहे ती देखील ऍडव्हान्स टेक्निकने उपयुक्त आहे. अंबानीच्या घरांमध्ये एक नाही तर एकंदरीत 9 हाय स्पीड लिफ्ट आहे. मुकेश अंबानी यांच्या घराचे नाव एंटीलिया आहे. एंटीलिया हा एक विदेशी शब्द आहे तसेच या एंटीलिया नावाचा अटलांटिक महासागर देखील आहे, जो एका बेटाच्या नावाने ओळखला जातो.

मुकेश अंबानी यांचे घर जगातील सर्वात महागड्या घराच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येते. हे घर एकंदरीत 4,00,000 वर्ग क्षेत्रफळावर पसरलेले आहे. बँकिंग हम पॅलेस ला जगातील सर्वात मौल्यवान संपत्ती मानले जाते. येथे ब्रिटनमधील महाराणी राहते. अंबानी यांचे घर जगातील सर्वात दुसरा क्रमांकावर असणारे महागडे घर समजले जाते. या घराची किंमत पंधरा हजार कोटी रुपये पर्यंत सांगली जाते . या घराच्या छतावर तीन हेलिपॅड देखील आहे यामुळे या घराचे वेगळेपण सिद्ध होते.
या घरामध्ये पार्टी एन्जॉय करण्यासाठी आईस्क्रीम पार्लर देखील आहे तसेच आईस हाऊस देखील आहे.