Headlines

विराट कोहलीने सोशल मीडियावर शेअर केला आपला दहावीचा रिझल्ट, “या” विषयांमध्ये सर्वात कमी मिळाले होते मार्क्स !

सध्या सगळीकडे आयपीएल सीझन चालू आहे. आयपीएल क्रिकेटची मॅच अनेक जण पाहत आहेत. या मॅच शी क्रिकेट आणि क्रिकेटर यांचे वेगवेगळे नाते आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक क्रिकेटर असतात, ज्यांची चर्चा आपण रोज करत असतो, त्यापैकी एक क्रिकेटर म्हणजे विराट कोहली. तुम्हा सर्वांना विराट कोहली हे नाव माहिती असेल. विराट कोहलीने आत्तापर्यंत आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आपले नाव उज्वल केलेले आहे.

विराट कोहलीने आतापर्यंत सिक्सर आणि चौके मारून मॅच पलटवली आहे आणि जीत प्राप्त केलेली आहे म्हणूनच विराट कोहली हे नाव क्रिकेट क्षेत्रामध्ये अगदी मानाने घेतले जाते. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीची कामगिरी उत्तम होती परंतु उत्तम सराव आणि मेहनतीच्या जोरावर विराट कोहलीने पुन्हा आपले सादरीकरण चांगले केलेले आहे. काही दिवसापूर्वी विराट कोहलीच्या आयुष्यामध्ये असे काही बदल घडले जे सगळे नकारात्मक होते, अशावेळी काही ठराविक लोकांनी विराट कोहलीला मदत केली. संकटाच्या वेळी धीर दिला, त्यापैकी महेंद्रसिंग धोनीचे नाव देखील घेतले जाते तसेच या सर्व अडचणीच्या काळामध्ये विरोध विराट कोहलीच्या पत्नीने म्हणजेच अनुष्का शर्मा ने देखील त्याला साथ दिली.

काही महिन्यापूर्वी सोशल मीडियावर विराट कोहली ची दहावीची मार्कशीट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती आणि हा विषय देखील माध्यमांसमोर चर्चेचा विषय झाला होता. वायरल झालेल्या या मार्केटमध्ये सीबीएससी चे अनेक विषयांचे मार्क्स त्याशीट मध्ये लिहिले होते. या मार्क्स शीट विषयांमध्ये गणित, मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र या विषयांचा समावेश आहे. या मार्क्स शीट वर सर्वात खाली “स्पोर्ट” असे देखील लिहिण्यात आले होते, त्याचबरोबर ही मार्कशीट वर अपलोड करण्यात आली होती.

विराट कोहलीने या संदर्भात असे देखील म्हटले की जो विषय तुमच्या शैक्षणिक जीवना मध्ये अधिक कमी महत्त्वाचा मानला जातो तोच विषय भविष्यात तुमच्या प्रगतीशी जोडला गेलेला असतो. 34 वर्षीय विराट कोहलीने वर्ष 2004 मध्ये दहावीचे शिक्षण पूर्ण केले. विराट कोहलीला गणितामध्ये 42 मार्क मिळाले होते आणि सी ग्रेड मिळाला होता. इंग्रजी विषयांमध्ये 81 मार्क व ए प्लस ग्रेड मिळाला होता सोशल मिळाल्यावर मोठ्या प्रमाणावर वायरल झाली होती तसेच अनेकांनी या व्हायरल झालेला मार्कशीटवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखील केल्या.

अनेकांनी तर स्वतःचे दहावीचे मार्क्स आणि विराट कोहलीचे मार्क्स यांची तुलना देखील केली. एकंदरीत काय तर विराट कोहलीला सांगायचं आहे की शाळेतील मार्क हे जरी तुमचे भविष्य ठरवत असले तरी तुमचे आयुष्य मात्र ठरवत नाही. तुम्ही तुमच्या जिद्दीवर आणि मेहनतीच्या जोरावर आयुष्यात यश हमखास मिळू शकतात, यासाठी फक्त तुम्हाला जिद्द आणि चिकाटी यांची आवश्यकता आहे.

विराट कोहली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो आणि त्याची पत्नी जेव्हा जेव्हा कधी बाहेर फिरायला जातात, तेव्हा अनेक व्हिडिओज आणि फोटो अपलोड करत असतात. काही दिवसापूर्वीच विराट कोहली आपल्या पत्नीसह देवदर्शनाला गेला होता. तेव्हाचे देखील अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. एकंदरीत काय तर विराट कोहली हा नेहमी माध्यमांच्या चर्चेत राहतो आणि स्वतःची चर्चा देखील करून घेत असतो.