Headlines

फक्त दीड महिनाच टिकले ललित मोदी आणि सुश्मिता सेनचे नाते, हा आला ब्रेकअपचा पुरावा, बघा !

अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांचे नाते कदाचित संपल्यातच जमा आहे असे वाटते. दिड महिन्यापूर्वी सोशल मीडिया अकाउंटवरुन आपल्या प्रेमाचे खुलेआम प्रदर्शन करणाऱ्या ललित मोदीचे आताचे इन्स्टाग्राम प्रोफाइल पाहिले असता तसेच काहीसे वाटते.

महत्वाचे म्हणजे त्यांच्या ब्रेकअपचे कारण सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल असल्याचे म्हटले जाते. पण सुष्मिता किंवा ललित मोदी या दोघांपैकी कोणीच त्यांच्या ब्रेकअप बदद्ल अधिकृतरित्या सांगितलेले नाही. पण ललित मोदींची इन्स्टाग्राम प्रोफाइल बदलल्यामुळे यूजर्सनी तसा तर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

ललित मोदींनी जुलैमध्ये इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर सुष्मिता सेनसोबतचे फोटो शेअर करून आपल्या नात्याची घोषणा केली होती. रिलेशनशिपच्या घोषणेनंतर, ललित मोदींनी आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये एक लांबलचक पोस्ट शेअर करत सुष्मिताचे वर्णन केले होते. त्यात त्याने सुष्मिताला आपली बेटरहाल्फ असे म्हटले.

तसेच त्यांनी इन्स्टाग्रामवर आपला प्रोफाईल फोटो बदलून तिथे सुष्मितासोबतचा रोमँटिक फोटो टाकला. यासोबतच इंस्टाग्राम बायोमध्ये ललित मोदींनी सुष्मिताही आपल्या आयुष्यातील प्रेम आहे लिहिले. तसेच एक पोस्ट शेअर करत ‘मी माझ्या जोडीदारासोबत नवीन आयुष्य सुरू करत आहे.’ या पोस्टमध्ये त्यांनी सुष्मिताला पार्टनर इन क्राइम तसेच ‘माय लव्ह’ अशा उपमा दिल्या होत्या.

मात्र दीड महिन्यानंतर ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांची प्रेमकहाणीही संपल्याचे दिसत आहे. कारण ललित मोदींनी त्यांचा प्रोफाईल फोटो बदलून बायोमधून सुष्मिताचे नावही काढून टाकले आहे. आता त्यांच्या बायोमध्ये फक्त आयपीएलचे संस्थापक आणि मून असे लिहिले आहे. हे पाहून यूजर्स हैराण झाले आहेत.


या बदलानंतर दोघांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच तुमची गोष्ट सुरू होण्याआधीच कशी संपली असा प्रश्न ललित मोदींना विचारत आहे. तर काही युजर्स ललित मोदींची खिल्ली उडवत आहेत.

या ब्रेकअपचे कारण सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल असल्याचे मानले जात आहे. अलीकडेच सुष्मिता सेन रोहमन शॉलसोबत अनेकदा दिसली होती. दोघांनी आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला एकत्र हजेरी लावली होती.

https://twitter.com/magentavibes/status/1565980134267424769

याशिवाय सुष्मिताच्या मुलीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्येही रोहमन सहभागी झाला होता. यानंतर सुष्मिता रोहमनशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे आणि ललित मोदींसोबतच्या ब्रेकअपचे हेच कारण असल्याचेही मानले जात आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !