Headlines

कोणाला पाहिजे असतात A ग्रेड कलाकार, तर कोणाला नको असतात बोल्ड सिन, जाणून घ्या बॉलिवूड कलाकारांच्या विचित्र मागण्या !

बॉलीवूडमधील अनेक कालकार आपल्याला आवडीचे असतात. त्यांच्या विविध आवडीनिवडी, स्टाईल यामुळे ते चर्चेत असतात. तर बॉलीवूडमधील आपल्या कलाकारांबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. जसे की त्यांचे चित्रपट, त्यांच्या आवडी-निवडीबद्दल माहिती असेलच, पण याच कलाकारांच्या काही विचित्र मागण्या डिमांडस आहेत ज्या प्रत्येकाला मान्य कराव्या लागतात.

त्यांच्या या मागण्या आज किंवा उद्यापासून नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. काहीही झाले तरी या कलाकारांनी कधीच आपल्या मागणीला विरोध होऊ दिला नाही. चला तर मग जाणून घेऊया आपल्या या कलाकारांबद्दलच्या विविध डिमांड……

अक्षय कुमार – बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार बद्दल सर्वांनाच माहिती आहे की कलाकार खूप काम करतात आणि याच कारणामुळे वर्षभरात त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. पण तुम्हाला माहित आहे का की अक्षय कुमारची चित्रपट करण्याआधी एक मागणी असते आणि ती म्हणजे तो रविवारी काम करत नाही. रविवारचा दिवस त्याच्यासाठी सुट्टीचा असतो आणि तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो.

करीना कपूर खान – करीना कपूर खान तिच्या वेगळ्याच स्टाईलमध्ये जगते. करीनाने आत्तापर्यंत अनेक अव्वल, मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे आणि भविष्यातही तिची हीच योजना आहे. वास्तविक, करीनाची मागणी आहे की ती नेहमीच ए ग्रेड कलाकारांसोबत काम करेल. चित्रपट साइन करण्यापूर्वी ती नेहमी पाहते की तिच्यासोबत काम करणारा अभिनेता ए ग्रेड लिस्टर आहे की नाही.

हृतिक रोशन – बॉलीवूडचा डान्सर कलाकार हृतिक रोशन त्याच्या तब्येतीची, फिटनेसची पूर्ण काळजी घेतो. हृतिक नेहमी पौष्टिक अन्न खाण्याचा प्रयत्न करतो मग तो घरी असो किंवा शूटवर आणि म्हणून तो जिथे शूट करतो तिथे मग देश असो किंवा परदेशात, त्यांच्यासोबत नेहमीच एक आचारी असतो जो त्यांच्यासाठी स्वयंपाक करतो.

सलमान खान – प्रसिद्ध कलाकार सलमान खानची अशी मागणी आहे जी प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्मात्याला मान्य करावी लागते. स्क्रिप्टची कितीही मागणी असली तरी तो कोणत्याही चित्रपटात बोल्ड किंवा इंटिमेट सीन देणार नाही, अशी सलमानची मागणी असते.

कंगना राणौत – सुप्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री कंगनाला कोणीही येऊन थेट कंगना राणौतशी बोलणे तिला आवडत नाही, त्यामुळे कोणाला काही बोलायचे असेल तर आधी ती व्यक्ती तिच्या असिस्टंटशी बोलते, असे तिने स्पष्ट केले आहे.

तिने तिच्या पर्सनल असिस्टंटला असेही सांगितले आहे की, जर कोणी काहीही विचारले तर असिस्टंट तिच्या अनुउपस्थितीतही बोलू शकते. इतकंच नाही तर कंगनाचा पर्सनल असिस्टंट नेहमीच तिच्यासोबत असतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !