Headlines

लिंबू पाणी विकत करोडपती झाली ११ वर्षाची मुलगी, जाणून घ्या नक्की तिने काय केलं ज्यामुळे ती झाली करोडपती !

आपल्या सर्व गरजा पूर्ण होतील आणि आपण आरामाचे सुखद जीवन जगू शकू यासाठी प्रत्येकजन सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. आपण व आपले कुटुंबीय यांना एक चांगले जीवन जगले पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असतो. सर्वच जन आपली स्वप्नपूर्ती करण्याच्या दिशेने कार्यरत असतात. काहींना लवकर यश मिळते तर काही जन बराच काल स्ट्रगल करताच असतात.

आज आपण एका अशा मुलीबद्दल जाणून घेणार आहोत जी ११ व्या वर्षीच करोडपती झाली आहे. ही कथा आहे मिकायला उल्मेर नावाच्या मुलीची. मिकायला नुकतीच १७ वर्षांची झाली आहे. जेव्हा ती ११ वर्षांची होती तेव्हा तिने लेमोनेडचा व्यवसाय सुरू केला आणि स्वतःचा लेमोनेड (लिंबूपाणी/पेय) ब्रँड तयार केला.

त्याच वेळी, लेमोनेड ब्रँड इतका लोकप्रिय झाला की २०१६ मध्ये सुपरमार्केट कंपनी होल फूड्स मार्केटने मिकायलाच्या ब्रँडशी करार केला. त्या बदल्यात मिकायला ८५ कोटींहून अधिक रक्कम मिळाली आणि ती क्षणार्धात करोडपती झाली.

nypost.com ने दिलेल्या अहवालानुसार, जेव्हा मिकायला चार वर्षांची होती, तेव्हा तिला तिच्या आजीकडून एक जुने कूकबुक मिळाले. या पुस्तकातून, मिकायलाला १९४० च्या दशकातील फ्लेक्ससीड लिंबूपाण्याची रेसिपी मिळाली. ती रेसिपी वापरण्याचे तिने ठरवले. जी पुढे देशात लोकप्रिय झाली.

फ्लॅक्ससीड हे वनस्पती-आधारित अन्न आहे, जे निरोगी चरबी, अँटिऑक्सिडेंट आणि फायबर प्रदान करते. काही लोक याला ‘फंक्शनल फूड’ असेही म्हणतात, म्हणजे एखादी व्यक्ती स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी ते खाऊ शकते.

आशियातील हजारो वर्षांपासून आयुर्वेदिक औषधात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मिकायलाने तिच्या वेबसाइटवर लिहिले – मी साखरेऐवजी फक्त मध घालून लिंबूपाणीला एक नवीन ट्विस्ट देण्याचा निर्णय घेतला. बी स्वीट लेमोनेडची सुरुवात अशी झाली.

अमेरिकेतील टेक्सास येथील घराबाहेर मिकायलाने लहान वयातच लिंबूपाणी विकायला सुरुवात केली. त्याची चव वाढवण्यासाठी तिने मधही घालायला सुरुवात केली. हळूहळू लोकांना ते लिंबूपाणी आवडू लागले. त्याचवेळी मिकायलाने मधासाठी मधमाशांच्या संरक्षणाचे कामही सुरू केले. तिने या ब्रँडला ‘Me & The Bees Lemonade’ असे नाव दिले.

प्राप्त अहवालानुसार, मिकायलाला २०१५ मध्ये शार्क टँक या टीव्ही शोमध्ये बोलावण्यात आले होते, त्यानंतर ती ४६ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात यशस्वी झाली होती. यादरम्यान मिकायलाने अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना लिंबूपाणीही दिले. तेव्हापासून त्या लेमोनेडची लोकप्रियता अधिक वाढली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !