Headlines

आपल्या एका मराठी कलाकारांसह आश्रम ३ वेबसिरीज मधील हे ७ कलाकार आहेत अविवाहित, एकतर आहे ४७ वर्षाचा !

प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल सध्या आश्रम या वेब सिरीजमुळे खुप चर्चेत आहे. या सिरीजमुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली. या सिरीजच्या पहिल्या दोन्ही पार्टचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले आता या सिरीजचा दुसरा पार्टसुद्धा आला आहे. आश्रम सिरीजमध्ये बॉबू मुख्य भुमिकेत दिसणार आहे. नुकताच या सिरीजचा 3 रा पार्ट एमएक्स प्लेअरवर रिलीज करण्यात आला यावेळी या सिरीजमध्ये अभिनेत्री इशा गुप्तासुद्धा होती.

या सिरीजमध्ये दिसलेले बहुतांश कलाकार अजूनही सिंगल आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांबद्दल सांगणार आहोत. ज्या कलाकारांचे वय उलटून गेले तरी अजूनहूी लग्न झालेले नाही.

चंदन रॉय सान्याल – चंदन रॉय सान्यालने आश्रम सिरीजमध्ये बॉबी देओलच्या साथीदाराची भूमिका साकारली आहे. चंदनच्या कामाचे कौतुक सर्वत्र होत आहे. या सिरीजमधील त्याच्या पात्राचे नाव भोपा स्वामी असे आहे. चंदन आता 42 वर्षांचा झाला आहे पण अजूनही तो अविवाहितच आहे.

दर्शन कुमार – दर्शन कुमारला द कश्मीर फाइल्स’या चित्रपटामुळे तुफान लोकप्रियता मिळाली. तो आश्रम या सिरीजमध्येसुद्धा दिसला आहे. त्यात त्याने एसआय उजागर सिंह हे पात्र साकारले. दर्शन आता 35 वर्षांचा झाला आहे.

अदिति पोहनकर – लय भारी या चित्रपटातून अदितिला खरी ओळख मिळाली. आश्रम या सिरीजचा ती महत्वाचा भाग होती. या सिरीजमध्ये तिने पम्मी पहलवान हे पात्र साकारले. अदितीचा जन्म 31 डिसेंबर 1994 ला झाला. ती सध्या 27 वर्षांची आहे.

अनुप्रिया गोयनका – अनुप्रिया गोयनकाने आश्रम 3 मध्ये डॉक्टर नताशा ही भूमिका साकारली होती. ती सध्या 35 वर्षांची आहे.

त्रिधा चौधरी – 28 वर्षांची त्रिधा चौधरी सध्या वेबसिरीजमधून गाजत आहे. या सिरीजमध्ये तिने अनेक बोल्ड सीन्स दिले. तिचे वय 28 वर्षे आहे.

ईशा गुप्ता – आश्रम 3 मध्ये ईशा गुप्ताचा बोल्ड अंदाज पहायला मिळतो. या सिरीजमध्ये ती बॉबीसोबत खूप बोल्ड सीन्स देताना दिसते. इशा आता 36 वर्षांची झाली आहे.

राजीव सिद्धार्थ – आश्रम सिरीजमध्ये रिपोर्टर अक्कीची भूमिका साकारणाऱ्या राजीव सिद्धार्थचे वय 36 आहे. पण तरीही त्याने लग्न करण्याचे अजून मनावर घेतलेले नाही.