Headlines

कियारा आणि सिद्धार्थच्या तीन दिवसाच्या लग्नासाठी तब्बल एवढा खर्च, पाहून डोळे पांढरे होतील !

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचे चाहते ज्या क्षणाची आतुरतेने डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. हे जोडपे आज विवाहबंधनात अडकणार आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

राजस्थानमधील जैसलमेरमधल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून दोघांचे लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू आहेत. या लग्नसोहळ्याच्या स्थळाचे फोटो सोशल मीडियावर आधीच लीक झाले आहेत. फोटोवरुन तरी दोघांनी आपल्या लग्नासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचे दिसते. नक्की किती हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

सिद्धार्थ कियाराचे रिलेशन – सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, दोघांनी आपल्या नात्याबद्दल कधीच काही सांगितले नाही. आता अखेर सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी लग्नबंधनात अडकणार आहेत.

लग्नाला येणार हे पाहुणे – सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाला 100 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्न पार पडणार असल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच तिथे पाहुण्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे.

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नात करोडो रुपयांचा खर्च – सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचे विवाहस्थळ सूर्यगढ पॅलेस खूप महागडे आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नासाठी खूप पैसा खर्च करत आहेत. असे म्हटले जाते की या सूर्यगढ पॅलेसची एप्रिल ते सप्टेंबरमध्ये बुकिंग असल्यास तिथे 1 दिवसाचा 1.20 करोड रुपये खर्च येतो.

तर ऑक्टोबर ते मार्च या टूरिस्ट सीजनमध्ये बुकिंग केल्यास एका दिवसाचा 2 करोड रुपये खर्च येतो. या हिशोबाने या जोडप्याच्या तीन दिवसाच्या लग्नसोहळ्याचा खर्च 6 करोड रुपये आहे. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांसाठी खास राजस्थानी संस्कृतीची व्यवस्था करण्यात आली आहे.

सिद्धार्थ आणि कियाराची लग्नानंतरची एकूण संपत्ती 103 कोटी रुपये असेल. सध्या सिद्धार्थकडे 80 कोटी रुपयांची संपत्ती आहे तर कियाराकडे 23 कोटींची संपत्ती आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !