Headlines

लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियारा या धक्कादायक कारणामुळे जाणार नाहीत हनिमूनला, जाणून घ्या !

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी बराच काळ एकमेकांना डेट करत होते पण याची कूणकूण त्यांनी कोणालाच लागू दिली नाही. त्यांनी आपले नाते फारच खाजगी होते. आणि आता अखेर त्यांनी लग्न केले आहे. 7 फेब्रुवारी 2023 ला सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांनी लग्न केले.

त्यांच्या लग्नाला मनीष मल्होत्रा, शाहिद आणि मीरा कपूर, करण जोहर, जुही चावला यांसारखे अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यांच्या लग्नात नो फोटो पॉलिसी असल्यामुळे उपस्थित पाहुण्यांना फोटो शेअर करता आले नाही. पण चाहते त्यांच्या लग्नाच्या फोटोंची डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते.

लग्नानंतर काही तासांनी सिद्धार्थ आणि कियारा यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपल्या लग्नाचे फोटो पोस्ट केले. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. दरम्यान, सिद्धार्थ आणि कियारा यांचा हनीमून प्लॅन समोर आला आहे. हे जोडपे सध्या हनिमूनला जाणार नसल्याचे बोलले जाते.

प्रत्येकजण सिद्धार्थ कियाराच्या लग्नाची आणि त्यांच्या लग्नाच्या फोटोंची वाट पाहत होते. लग्नानंतर दोघांनी रात्री उशिरा आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे विवाहित जोडपं सध्या हनिमूनला जात नाहीये.

कियारा आणि सिद्धार्थ सध्याचे बॉलिवूडमधील टॉपचे कलाकार आहेत यात शंका नाही. त्यामुळे त्यांच्या पदरात सध्या ढीगभर काम आहे. अशा परिस्थितीत, कामामुळे हनिमूनला उशीर होऊ शकतो असे म्हणता येईल आणखी एक कारण त्यांच्या हनिमूनमध्ये बाधा आणत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ-कियारा यांचे लग्न जैसलमेरमध्ये झाले आहे, परंतु तरीही काही पंजाबी आणि सिंधी विधी पूर्ण करायचे बाकी आहेत, ते विधी सिदधार्थच्या घरी दिल्लीला परतल्यावर केले जाणार आहेत. हे विधी पूर्ण होईपर्यंत त्यांना त्यांचा हनिमून करता येणार नाहीय.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !