Headlines

खूपच हँडसम आणि कूल आहे माधुरी दीक्षितचा मुलगा, मीडिया पासून दूर राहून करतो हे काम !

आपल्या सर्वांना माधुरी दीक्षित माहीतच आहे. माधुरी दीक्षितला बॉलीवूडमधील “धक धक गर्ल” म्हणून ओळखतात. तिने एकेकाळी प्रेक्षकांची धकधक वाढवली होती आणि आपल्या सुंदर मोहक अदा ने प्रेक्षकांना नाचायला देखील लावले होते. आतापर्यंत माधुरी दीक्षित नेने यांनी अनेक चित्रपट देखील केलेले आहे.

काही काळ पतीसोबत अमेरिकेला राहिल्यानंतर तिने जोरामध्ये बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये कमबॅक केले, त्यानंतर काही पुन्हा चित्रपटांमध्ये काम देखील केले. आता आपल्याला माधुरी दीक्षित जज म्हणून देखील पाहायला मिळते. एकंदरीत माधुरी दीक्षितचा चाहता वर्ग हा आगळा वेगळा आहे, तो तिला भरभरून प्रेम करत असतो.

आज आम्ही तुम्हाला तिच्या मुलाबद्दल सांगणार आहोत. आज जरी माधुरी दीक्षित जरी आई असली तरी तिच्या वयावरून ही आज ही सोळा वर्षाची मुलगी आहे असेच दिसते. तिने स्वतःला इतके फिट ठेवले आहे की प्रत्येक जण तिच्या प्रेमामध्ये पडतो. अनेकदा सेलिब्रिटी म्हटले की त्यांचे मुलं माध्यमांसमोर चर्चेचा विषय बनलेला असतो.

अनेकदा आपण माध्यमांवर “सेलिब्रिटी किड्स” देखील पाहत असतो. या सेलिब्रेटच्या किड्सची लाईम लाईट मध्ये उपस्थिती असते परंतु या सर्व गोष्टी माधुरी दीक्षित यांच्या मुलांच्या बाबतीत खूप घडत नाही. आज ही माधुरी दीक्षित यांची मुलं कुठेच आपल्याला पाहायला मिळत नाही. मीडिया लाईम लाईट पासून लांब राहून माधुरी दीक्षितचे मुलं अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने जीवन जगत आहेत.

गेला काही दिवसापासून माधुरी दीक्षितच्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहेत आणि या सर्व फोटोंना लोक पसंती देखील करत आहेत. या फोटोला शेअर देखील केलेले आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, माधुरी दीक्षित ची मुलं अमेरिकेमध्ये राहतात. तेथे राहून आपले शिक्षण पूर्ण करत आहेत, त्याचबरोबर तुम्हा सर्वांना माहितीच आहे की माधुरी दीक्षित यांनी डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केले होते त्यानंतर काही वर्ष माधुरी परदेशी गेल्या होत्या.

माधुरी दीक्षित यांचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी काही दिवसापूर्वीच आपल्या एका युट्युब व्हिडिओमध्ये आपल्या सेलिब्रिटी पत्नी सोबत माधुरी आणि मुलगा अरीन यांच्यासोबत अमेरिकेमध्ये राहत असतानाचे काही अनुभव शेअर केले आहे. अरीन सध्या अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया विश्वविद्यालयांमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे. डॉक्टर श्रीराम लेने यांनी बनवलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आणि अनेक माध्यमांनी या व्हिडिओबद्दल चर्चा देखील केली.

अनेक वर्तमानपत्रांनी आपल्या हेडिंग देखील बनवल्या. हा व्हिडिओ बघत असताना अनेकांचे लक्ष माधुरी दीक्षितचा मुलगा अरीन यांच्याकडे गेले. माधुरी दीक्षित चा मुलगा दिसायला अगदी सुंदर, हॉट, हँडसम आणि कुल आहे, असे म्हणायला हरकत नाही.

अनेकांचे असे म्हणणे आहे की, अरीन अगदी दिसायला हिरो सारखा आहे. जर त्याने बॉलीवूड क्षेत्रामध्ये पदार्पण केले तर तो मोठ्या मोठ्या हिरोंना आपल्या लूकच्या माध्यमातून सहजच टक्कर देईल, त्याचबरोबर काही जणांचे असे देखील म्हणणे आहे की अरीन एकदमच यंग संजय दत्त दिसत आहे. एकंदरीत काय माधुरी दीक्षित चा मुलगा आणि माधुरी पुन्हा या व्हिडिओच्या निमित्ताने चर्चेमध्ये आले आहेत.