Headlines

बिना लग्न करताच या प्रसिद्ध अभिनेत्रीला व्हायचंय आहे आई, स्वतःच बोलून दाखवली मनातली गोष्ट

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर अभिनेत्री मृणाल ठाकुर मोठ्या पडदा गाजवत आहे. मृणालचा सीता रामम हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या पात्राचे खूप कौतुक केले गेले. या चित्रपटात तिच्यासोबत रश्मिका मंदान्ना आणि दुल्कर सलमान मुख्य भूमिकेत होते. मृणालने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक इच्छा व्यक्त केली आहे.

मृणालने तिला कसे प्रेमात पडायचे आहे, तिच्या जीवनसाथीबद्दल कोणत्या अपेक्षा आहेत, तसेच तिला मुलं हवे असे का वाटते या सर्व गोष्टींचा खुलासा केला.

मृणाल आणि अभिनेत्री श्रिया पिळगावकरने बंबल्स डेटिंग दिस नाईट्सच्या दुसऱ्या भागात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी 30 व्या दशकांत डेटिंग कशी असेल याबद्दल चर्चा केली.

मृणाल तिला आपल्या जोडीदारामध्ये काय हवे आहे ते सांगितले. मला वाटते की मी कुठची आहे, माझ्या मनात काय चालले आहे आणि मी कोणत्या व्यवसायात आहे या गोष्टी होणाऱ्या जोडीदाराने समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या आजूबाजूला खूप असुरक्षितता आहे, त्यामुळे मला फक्त अशा व्यक्तीची गरज आहे जो स्वत: सुरक्षित असेल. पण असे लोक सापडणे फार दुर्मिळ आहे.”

लोक जैविक गोष्टींबद्दल जागुरक असतात का या श्रियाच्या उत्तरावर मृणाल म्हणाली की, मला अनेकदा असे वाटते की एका बाळाला जन्म द्यावा. त्यासाठी मला माझे एग्ज फ्रिज करायाचे आहेत किंवा सिंगल मदर व्हायचे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !