Headlines

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा या राजकीय नेत्यासोबत करत आहे डेट, नाव पाहून तुम्हालाही धक्का बसेल !

परिणीती चोपड़ा बॉलीवुड मधील लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक आहे. आतापर्यंत परिणीती ने वेगवेगळया भूमिकेच्या माध्यमातून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. आतापर्यंत परिणीतीने एकापेक्षा एक चित्रपट केले अन् चाहत्यांसाठी तिने मनोरंजन देखील केले आहेत तसे पाहायला गेले तर परिणीती चोपडा ने आतापर्यंत अनेक अभिनेत्यांना डेट केले आहे परंतु हल्ली परिणीती चोपडाचे नाव एका दिग्गज नेत्यासोबत जोडण्यात आलेले आहे.

गेल्या काही दिवसापासून परिणीती चोपडा राजकीय पक्ष आप चे नेते राघव चड्ढा सोबत दिसत आहे. या दोघांना पाहिल्यानंतर बॉलीवूडमध्ये या दोघांबद्दलची चर्चा देखील जोरात चालू आहे. अनेकांच्या मनामध्ये या दोघांबद्दल वेगवेगळे प्रश्न देखील निर्माण होत आहेत.

या दोघांना अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न देखील विचारत आहेत, असेच एके दिवशी राघव चड्ढा यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले, तुम्ही दोघेजण अनेक दिवसांपासून एकत्र दिसत आहात तर तुम्ही परिणती चोप्रासोबत लग्न करणार आहात का? तर अशावेळी राघव यांनी व्यक्तिगत जीवनाबद्दल कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारू नये, अशी विनंती देखील माध्यमांच्या प्रतिनिधींना केली. जे काही प्रश्न विचारायचे असतील ते राजकारणासंबंधी विचारावे असे देखील म्हटले.

परिणीती नुकतेच आम आदमी पार्टी चे नेते आणि संसद प्रतिनिधी राघव चड्ढासोबत एका ठिकाणी दिसली तर अशावेळी परिणीतीला वेगवेगळे प्रश्न बॉलीवूड क्षेत्रातून विचारले जात आहे, त्याचबरोबर नेत्याच्या उत्तरामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडिओ देखील आहे या व्हिडिओमध्ये नेते राघव संसद मधून दिल्ली ला परतत आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये राघव आणि परिणीती डिनर करत आहे असे देखील चित्र दिसले.

संसदेतून मधून बाहेर पडतेवेळी खासदार राघव यांना पत्रकारांच्या काही प्रश्नांना सामोरे जावे लागले अशा वेळी रिपोर्टरने विचारले की,तुम्ही मुंबईमध्ये एकत्र दिसलात. तुमच्या लग्नाची चर्चा होत आहेत, या चर्चा काही खऱ्या आहेत का? अशावेळी रागावू यांनी मजेदार प्रतिक्रिया देत म्हणाले की, कृपया करून जे काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत ते राजकारणाशी संबंधित असू,द्या परिणीती संदर्भात नको. त्याचबरोबर पुढे त्यांनी कोणत्याही प्रकारचे विधान केले नाही…आता येणारा काळच ठरवेल की या दोघांच्या चर्चा या अफवा आहेत की खऱ्या.