Headlines

ऑस्करला जाण्याआधी रामचरण आणि पत्नी उपासना पोहचले प्रियंकाच्या लॉस एंजेलेस घरी, फोटोंनी जिंकले चाहत्यांचे हृदय !

एकेकाळी बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा आज हॉलीवुड क्षेत्रामध्ये वर्चस्व करत आहे. प्रियंका चोपडा हॉलीवुड मध्ये अनेक चित्रपटांमध्ये आतापर्यंत आपल्याला दिसून आलेली आहे. जरी प्रियंका चोपडा बॉलीवूड सोडून गेली असली तरी ती वेगवेगळ्या कारणाने बॉलीवूडमध्ये चर्चेत नेहमी असताना आपल्याला दिसते. ती अनेकदा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग देखील घेते व तसेच आपल्या वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने ती भारतीय प्रेक्षकांची नेहमीच जोडलेली राहते.

आजही प्रियंका चोपडाने असे कार्य केले आहे, ज्यामुळे पुन्हा माध्यम क्षेत्रामध्ये तिचे नाव कौतुकाने घेतले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर प्रियंका चोपडा ही नेहमी चर्चेचा विषय बनलेली आहे. प्रियंका चोपडा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते, ती वेगवेगळ्या पोस्ट आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. काही दिवसापूर्वीच ऑस्कर अवॉर्ड शो पार पडला परंतु या या ऑस्कर शोची प्री पार्टी देखील आयोजित करण्यात आली होती. ही पार्टी खुद्द प्रियंकाने आयोजित केली होती. या पार्टीमध्ये 2023 वर्षात ज्यांना नामांकन मिळाले होते, त्या सर्व नामांकन प्राप्त कलाकारांसाठी एक पार्टी ठेवण्यात आली होती.

अशातच अभिनेत्री प्रियंका चोपडा आणि निक जोनस यांच्याद्वारे नियोजित केलेल्या या पार्टीमध्ये आपल्याला साउथ इंडस्ट्रीजचे सुपरस्टार अभिनेता रामचरण आणि त्याचे कुटुंब देखील दिसले. या पार्टीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामचरण या पार्टीला एकटा नव्हता तर तो आपल्या पत्नीला देखील सोबत घेऊन आलेला होता. रामचरण च्या पत्नीचे नाव उपासना आहे. ही पार्टी प्रियंका ने आपल्या अमेरिकेच्या घरी आयोजित केली होती. या पार्टी दरम्यान प्रियांकाने रामचरण आणि त्याच्या पत्नीचे अगदी थाटामाटा मध्ये घरी स्वागत केले. या पार्टीला प्रियंकाचे आई-वडील सासू-सासरे तसेच अनेक देखील उपस्थित होते.

या पार्टीमध्ये प्रियंका चोपडा आणि रामचरण यांच्यामध्ये खूप गप्पादेखील झाल्या तसेच प्रियंकाने रामचरण च्या पत्नी सोबत काही वेळ देखील घालवला. एकंदरीत पार्टीचे वातावरण इतके प्रभावित झाले होते, की या पार्टीमध्ये काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत अनेकांनी या पार्टीबद्दल प्रियंकाचे कौतुक देखील केलेले आहेत. या पार्टीमध्ये काही फोटोशूट देखील केले गेले हे सारे फोटो रामचरण ची पत्नी उपासनाने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून चाहत्यांसाठी शेअर केले. हे फोटो पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या.

अनेकांनी दोघांना शुभेच्छा दिल्या तर प्रियंका साठी अनेकांनी शुभ आशीर्वाद तसेच शुभेच्छा देखील दिल्या. अनेकांनी कमेंट करताना असे देखील म्हटले की, आज जरी प्रियंका भारतामध्ये राहत नसली तरी भारतीय कलाकारांच्या प्रति असलेले त्याचे प्रेम वाखडण्याजोगे आहे आणि या सर्व गोष्टी फक्त एक भारतीय कलाकारच करू शकतो,असे देखील प्रियंकाच्या चाहत्यांनी या साऱ्या फोटोंवर कमेंट केली आहे.

हे सारे फोटो सोशल मीडियावर अक्षरश: व्हायरल होत आहे. या फोटोमधील रामचरण प्रियंका चोपडा आणि उपासना यांच्या लूक बद्दल बोलायचे झाल्यास हे तिघेही खूपच सुंदर दिसत होते. या तिघांनी घातलेल्या कपड्यांची चर्चा देखील बॉलीवूडमध्ये केली जात आहे. अभिनेता रामचरण पूर्ण काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसला तर त्याची पत्नी उपासना आपल्याला मल्टी कलर आऊट फिट मध्ये दिसली. या आऊट फिट मध्ये उपासना खूपच फुल आणि निरागस दिसत होती तसेच तिच्या चेहऱ्यावरचे तेज खूप काही सांगून जात होते.

प्रियंका चोपडा च्या लूक बद्दल बोलायचे झाल्यास प्रियांका चोपडाने वाईट रंगाचा ड्रेस परिधान केला होता आणि निक ने नेव्ही ब्लू कलर कपड्यांमध्ये दिसले होते. या दोन्ही कपड्यांमध्ये प्रियांका आणि निक खूपच हॉट आणि सेक्सी दिसत होते आणि रामचरण व उपासना या दोघांनी या फंक्शनला उपस्थिती राहिल्याने दाखवल्याने या पार्टीची रंगत अजूनच वाढत गेली.