Headlines

या अभिनेत्रीसाठी आपली पत्नी आणि मुलगा सोडून रोहित राहिला लिव इन रिलेशनशीप मध्ये !

बॉलीवूड इंडस्ट्री हे असे क्षेत्र आहे, जेथे आपल्याला रोजच्या रोज काहीना काही चर्चा ऐकायला मिळतात. कधी कोणाचे लग्न झालेले असते तर कधी कोणाचे ब्रेकअप होत असते, तर कधी कोणी कुणाच्यातरी प्रेमात पडलेलं असतं, अशा पद्धतीने काही ना काही घटना बॉलीवूडमध्ये रंगत असतात. या घटनांची चर्चा देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर होत असते. हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये असे अनेक दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या चित्रपट निर्मिती शैलीमुळे सगळीकडे चार चांद लावलेले आहेत. आपल्या सर्वांना रोहित शेट्टी माहितीच असेल.

रोहित शेट्टीने आतापर्यंत या इंडस्ट्रीमध्ये एका पेक्षा एक चित्रपट बनवलेले आहेत. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरपूर प्रमाणात गल्लादेखील जमवला आहे. लहानपणापासूनच रोहितला या बॉलीवूड इंडस्ट्रीचे आकर्षण होते. रोहित यांचे वडील देखील या चित्रपटसृष्टीमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करायचे. रोहित यांच्या वडिलांचे नाव दिवंगत एम बी शेट्टी असे होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये स्टंटमॅन भूमिका केली होती. आणि चित्रपटांमध्ये डान्सर, कोरिओग्राफर अशा वेगवेगळ्या प्रकारची शैली असलेले कार्य देखील रोहित यांच्या वडिलांनी पार पाडले आपले वडील या चित्रपटसृष्टीमध्ये असल्याकारणाने देखील रोहित यांनी या चित्रपटसृष्टीकडे भविष्यात वाटचाल करावी असा मनामध्ये विचार केला आणि त्यानुसार स्वतःचे शिक्षण देखील पूर्ण केले.

सुरुवातीच्या काळामध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून देखील त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. अनेक वर्ष छोटी मोठी काम करत असताना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर कालांतराने दिग्दर्शक म्हणून देखील आपले नशीब त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये आजमावले आणि त्यानंतर त्यांना कधीच मागे वळून पाहावे लागले नाही. रोहित यांचे अनेक चित्रपट आज ही लोक आवडीने पाहतात. रोहित यांच्या चित्रपटात चित्रपटाचा एक प्रमुख विषय म्हणजे खूप सारे स्टंट आपल्याला पाहायला मिळतात. 2003 मध्ये आलेला चित्रपट जमीन या चित्रपटाद्वारे रोहित ने दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. रोहितांना खरी ओळख 2006 मध्ये आलेला चित्रपट गोलमाल द्वारे मिळाली.

बॉलीवूड सिस्टीम मध्ये दिग्दर्शक म्हणून विशिष्ट ओळख प्राप्त झाल्यानंतर 2005 मध्ये रोहित यांनी लग्न केले आणि आपल्या सुखाचा संसार करू लागले परंतु या सुखाच्या संसारामध्ये देखील अनेक विघ्न येऊ लागले. वर्ष 2016 मध्ये रोहित च लग्न माया शेट्टी सोबत झाले. रोहित आणि माया यांना एक मुलगा देखील आहे. त्यांचा संसार व्यवस्थित रित्या चालू असतानाच काही वर्षानंतर एका अभिनेत्रीची त्यांच्या संसारामध्ये एन्ट्री झाली आणि सगळे गणितच फिस्कटले. दोघांच्या जीवनामध्ये खूप सार्‍या अडचणी निर्माण होऊ लागल्या. एकमेकांसोबत काम करत असतानाच रोहित आणि अभिनेत्री एकमेकांच्या जवळ आले. दोघांची चांगली ओळख देखील निर्माण झाली. दोघांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण होऊ लागले.

रोहित आणि प्राची दोघे ही पहिल्यांदाच चित्रपट बोलबच्चन च्या सेटवर भेटले होते. प्राची ने यात भूमिका देखील केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी ने केले होते त्यानंतर यांची मैत्री वाढतच गेली. या दोघांमधील नातेसंबंध वाढत असताना दोघांनाही कोणत्याच गोष्टीची काळजी नव्हती तसेच या नात्यांमध्ये रोहित आपण विवाहित आहोत याचे भान देखील त्याला नव्हते तसेच प्राचीला रोहित शेट्टी विवाहित असला तरी काहीच समस्या नव्हती. एकंदरीत या दोघांचे अफेअर सुरू झाले होते. इतकेच नाही तर रोहित ने प्राचीसाठी आपली बायको व मुलाला देखील सोडले.

दोघेही कालांतराने लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले. काही काळ प्राची आणि रोहित यांचे नातेसंबंध बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय राहिला होता. रोहित च लग्न तुटता तुटता वाचले होते. या दोघांचे नातेसंबंध यांची चर्चा जोरात होत असताना प्राची ने मात्र या सर्व गोष्टीतून ब्रेकअप घेतला आणि त्यानंतर रोहित पुन्हा आपल्या संसारामध्ये व्यवस्थित लक्ष घालू लागला, अशा प्रकारे रोहितने आपल्या आवडत्या अभिनेत्री साठी संसाराला देखील नाकारले होते.