Headlines

पत्नी अनुष्का शर्मा आणि मुली सोबत सोबत विराट कोहली घालवत आहे निवांत क्षण, पहा !

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात शतक झळकावून नवीन वर्षाची शानदार सुरुवात केली. पण 2020 ते 2022 या काळात विराटला अतिशय वाईट टप्प्यातून जावे लागले.

या अडीच वर्षांत विराटला योग्य कामगिरी करता आली नाही, त्यामुळे त्याला अनेकदा चांगले-वाईट ऐकावे लागले. या काळात त्याला त्याच्या पत्नीने भक्कम साथ दिली होती. दोघे पती पत्नी लाईम लाईट मध्येही असतात.

अनेकदा ते सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करतात. त्यांचे फोटो म्हणजे चाहत्यांसाठी एक प्रकारची पर्वणी असते. काही दिवसांपूर्वीच त्यांची लेक वामिकाचा दुसरा वाढदिवस झाला. यावेळी त्यांनी तिच्यासोबत चा सुंदर फोटो शेअर केला होता.

विराटने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये तो आपली पत्नी अनुष्का सोबत समुद्रकिनारी ब्रेकफास्ट करताना दिसत आहे. फोटोत विराटने केशरी रंगाचे शॉर्ट्स घातली आहे. हातात ड्रिंक चा ग्लास पकडून तो फोटोसाठी स्माईल देत आहे. तर अनुष्काने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालून डोळ्यावर सनग्लासेस लावले आहेत.

फोटो त्यांची मुलगी ही त्यांच्या जवळ बसलेली आहे मात्र तिला फ्रेम मध्ये घेतलेले नाही. विशेष म्हणजे या फोटोला एका तासात दहा लाखांहून अधिक लाईक मिळाल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)


या फोटोवर एका युजरने मजेत कमेंट केली की कदाचित हा फोटो वामिकाच काढत असेल. ११ जानेवारीला विराट आणि अनुष्का च्या मुलीचा दुसरा वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त विराटने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर तिच्यासोबत चा एक गोड फोटो शेअर करून कॅप्शन मध्ये माझ्या हृदयाची धडकन आज दोन वर्षांची झाली असे लिहिले होते. विराट आणि अनुष्का चे लग्न 2017 मध्ये इटली येथे झाले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !