“टिप टिप बरसा पानी” गाण्यावर भिजून कतरीना कैफने असा डान्स केला पाहून वेडे व्हाल !

bollyreport
2 Min Read

बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ ही सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. तिचे सौंदर्य नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालते. याशिवाय तिचा डान्स हा मोठमोठ्या कलाकारांच्या तोडीस तोड असतो. त्यामुळेच तिने डान्स केलेली सर्वच गाणी सुपरहिट होतात. तिला बॉलिवूडची महागडी अभिनेत्री म्हणून सुद्धा ओळखले जाते.

काही दिवसांपूर्वी कतरीनाचा फोनभूत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो फारसा चालला नसला तरी त्यातील तिच्या अभिनयाचे आणि डान्सचे खूप कौतुक करण्यात आले होते. त्या आधी कतरीनाचा सूर्यवंशी हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. या चित्रपटात कतरीनासोबत अभिनेता अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसला होता.

चित्रपटातील अक्षय आणि कतरीनावर चित्रीत करण्यात आलेले टिप टिप बरसा पानी हे गाणे खूप गाजले. आजही हे गाणे कधी लागले तर प्रत्येकजण ठेका धरण्यास सुरुवात करतात. खरतरं हे गाणे रिमेक व्हर्जन आहे. या आधीच्या गाण्यात अक्षय कुमार आणि रविना टंडनने डान्स केला होता. तेव्हाही या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती. तसेच आता सूर्यवंशी चित्रपटासाठी रिमेक करण्यात आलेले गाणे सुद्धा खूप गाजले.

https://www.youtube.com/watch?v=l9u8Zb4fY1c

कतरीना या गाण्यात खूपच हॉट दिसत होती. तिने खूपच मादक आणि बोल्ड डान्स केलेला पाहायला मिळाला. व्हिडिओमध्ये कतरीना गोल्डन कलरची साडी परिधान करून पाण्यात भिजत अतिशय हॉट पद्धतीने डान्स करता पाहायला मिळते. व्हिडिओमधील तिचा बोल्डनेस, अदा पाहून चाहत्यांना तिची भूरळ पडली आहे. त्यात साडीमुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.

कतरीनाच्या कामाबद्दल बोलायचे ती लवकरच सलमान खानसोबत टायगर तीन या चित्रपटात दिसणार आहे. तसेच प्रियंका चोप्रा आणि आलिया भट्टसोबत जी ले जरा या चित्रपटात दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.