शाहरुखच्या मुलीला या व्यक्तीने दिला हा खास सल्ला, एकावेळी दोन मुलासोबत चुकूनही हे करू नको !

238

करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो कोणत्या ना कोणत्या कारणमुळे चर्चेत असतोच. या शो मध्ये इंडस्ट्रीतले अनेक कलाकार करणसोबत कॉफी प्यायला येतात. व ते या शोमध्ये इंडस्ट्रीतली तसेच आपल्या वैयक्तिक आयुष्यातली अनेक गुपिते सांगतात.

सध्या या शोचा 7 वा सीजन सुरु असून यात आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार येऊन गेले आहेत. आता येणाऱ्या आगामी एपिसोडमध्ये गौरी खान आपल्या खास मैत्रिणी महीप कपूर आणि चंकी पांडेची पत्नी भावना पांडेसोबत दिसणार आहे.

शोमध्ये गौरीने अनेक गुपितांचा उलघडा केला. सध्या किंग खानचे संपूर्ण कुटुंबच चर्चेत असते. शाहरुख आणि गौरीची लेक सुहाना खानही लाइमलाइटमध्ये चर्चेचा विषय बनू लागली आहे. त्यामुळे करणने गौरीला सुहानाबद्दलही काही प्रश्न विचारले.

करणने गौरीला विचारले की, तू सुहानाला कोणत्या डेटींग टीप्स देशील. याचे उत्तर देताना गौरी म्हणाली की, सुहानाने कधीही दोन मुलांना एकत्र डेट करू नये. तिचे हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित सर्वजण हसायला लागतात.

सुहाना खान आता लवकरच झोया अख्तरच्या ‘द आर्चिज’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत पदार्पण करत आहे.या चित्रपटात तिच्यासोबत श्रीदेवी आणि बोनी कपूरची लेक खुशी कपूरही पदार्पण करत आहे.

त्याचबरोबर करणने संजय कपूरची पत्नी महिप कपूरला तुला कोणासोबत काम करायला आवडेल असा प्रश्न विचारला यावर तिने ह्रतिक रोशनचे नाव घेतले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !