Headlines

फक्त २ तास झोपायचा सुशांत आणि बाकी वेळ… वाढदिवसादिवशी कियाराने सांगितली धक्कादायक गोष्ट !

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आ’त्म’ह’त्या प्रकरण मध्यंतरी खूपच गाजलं. अभिनेत्याच्या मृत्यूला अडिच वर्षे उलटूनही त्याचा काही छडा लागलेला नाही. या प्रकरणी अजूनही तपास चालू आहे. सुशांत आता आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणी मात्र चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत.

आजच्या दिवशीच म्हणजेच 21 जानेवरी 1986 ला सुशांत सिंह राजपूतचा जन्म झाला होता. त्याचा जन्म बिहारची राजधानी पटना येथील आहे.

सुशांतचा आज वाढदिवस असल्यामुळे चाहते तसेच त्याचा मित्रपरिवार सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा आणि श्रद्धांजली देत आहेत. तसेच आज पुन्हा एकदा त्याला न्यान मिळावा यासाठी मागणी करत आहेत. सुशांतच्या मृत्यूला दोन वर्षांहून अधिक काळ लोटूनही त्याच्या मृत्यूचे कोडे सुटलेले नाही.

14 जून 2020 मध्ये सुशांतने आपल्या मुंबईमधल्या वांद्रे येथील राहत्याघरात घळफास लावून आत्महत्या केली होती. सीबाआय त्याच्या मृत्यूचा तपास करत आहे. टीव्ही मालिकांमधून आपल्या करीअरची सुरुवात करणारा सुशांत बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध झाला होता.

सुशांतबद्दल अभिनेत्री कियारा अडवाणीने एक धक्कादायक खुलासा केला होता. कियाराने सुशांत सोबत एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात एकत्र काम केले होते. एका मुलाखतीत कियाराने सांगितले की, सुशांत फक्त 2 तास झोपायचा. तो निद्रानाशी झाला होता. तसेच सेटवरही तो कधीच थकलेला दिसायचा नाही.

कियाराने ऑनस्क्रिन सुशांतच्या पत्नीची भूमिका साकारली होती. कियाराने सांगितले की, मला थकायला झाले की मी सेटवर झोपायची. तेव्हा सुशांतने मला सांगितलेले की, आपण सात ते आठ तास झोपलो तरी आपला मेंदू 2 तासच झोपतो. बाकीच्या वेळी आपण बेशुद्ध असतोपण आपला मेंदू सिक्रिय असतो. त्यामुळे आपल्या शरीराला केवळ 2 तासांची झोप पुरेशी असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !