आलिया भट्ट शिवाय अभिनेता रणबीर कपूर बाथरूमला पण जात नाही, म्हणाला मला ती सारखी जवळ पाहिजे !

bollyreport
3 Min Read

एप्रिल महिन्यात अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कूपरचे लग्न झाले त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी त्यांनी ते आईबाबा होणार असल्याची बातमी सर्वांना कळवली. आलियाशी लग्न झाल्यापासून रणबीरचे आयुष्य संपूर्ण बदलून गेले आहे. रणबीरच्या मते आलियाशिवाय त्याचे आयुष्य अधुरे आहे. त्याला आलियाची इतकी सवय झाली आहे की आता त्याला आपली दैनंदिन कामे करण्यासाठी सुद्धा आलियावर निर्भर रहावे लागते.

रणबीरला आलिया दिसली नाही तर तो बाथरुमला सुद्धा जात नाही किंवा जेवत देखील नाही. याबाबतचा खुलासा स्वता रणबीरने नवभारत टाइम्सला मुलाखत देताना केला.

रणबीर आणि आलिया गेली पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. सध्या ते ब्रह्मास्त्र या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीरने शिवा ही भूमिका तर आलियाने इशाही भूमिका साकारली आहे. मुलाखतीत रणबीरने आलियाशी लग्न केल्यानंतर त्याचे आयुष्य कसे बदलले ते सांगितले.


रणबीर म्हणाला की, मी खूप मोठेपणा करतो की मी कोणावर अवलंबून नाही. पण मी आलियावर खूप अवलंबून आहे. आलिया कुठे आहे हे माहित नसेल तर मी बाथरुमला सुद्धा जात नाही किंवा जेवतसुद्धा नाही. आलिया माझ्याजवळ असणे खूप महत्वाचे आहे. मग तेव्हा आम्ही एकमेकांशी बोललो नाही किंवा एकमेकांशी रोमॅण्टिक गोष्टी केल्या नाहीत तरी ती मला माझ्या शेजारी दिसायला हवी. तेच माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे.

ब्रह्मास्त्रमध्ये जसे शिवा आणि ईशा एकमेकांशिवाय अधुरे आहेत तसेच मी आलियाशिवाय अधुरा आहे असे रणबीर म्हणाला. रणबीरने पुढे सांगितले की, शिवा आणि ईशा हे चित्रपटातील पात्र आहेत. प्रत्येक नात्याप्रमाणे आमच्यातसुद्धा काही चांगले तर काही वाईट दिवस असतात.

पण आम्ही एकमेकांसाठी सर्वोत्तम देण्याच्या सतत प्रयत्नात असतो. आमचे रिलेशनशिप खूप रोमॅण्टिक आहे किंवा आम्ही खूपच प्रेमात आहोत असे नाही. प्रेम तर सर्वचजण करतात. पण हा एक संघर्ष आहे. रिलेशनशिप खडतर असतात. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

तर आलिया म्हणाली की ती आणि रणबीर वेगवेगळे ठिक आहेत पण एकत्र खूप मस्त आहेत. रणबीर तिच्याशिवाय काहीच करु शकत नाही हे आलियाने सुद्धा मान्य केले. आलियाने सांगितले की, तब्येतीसंदर्भात मी नसेन तर रणबीर अगदी शेवटच्या मिनिटाला सर्व सोडून देतो. या गोष्टीसाठी आलिया खूपच चिंतेत असते. त्याच्या त्या सवयी आलियासारखी तपासत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.