विद्या बालनच्या साडीचा पदर एका व्यक्तीने ओढल्यामुळे फिटली तिची साडी, कॅमेऱ्या समोर तोंड लपवून नेसली … !

bollyreport
3 Min Read

‘परिणीता’ या चित्रपटातून बॉलिवूड करीअरची सुरुवात करणारी अभिनेत्री विद्या बालन आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. ती उत्कृष्ट अभिनेत्री आहे. यासोबतच विद्या बालन नेहमीच तिच्या वेगवेगळ्या साड्यांसाठी चर्चेत असते. इव्हेंट्स आणि अवॉर्ड फंक्शन्समध्ये विद्या नेहमीच सुंदर साड्यांमध्ये दिसते.

अलीकडेच विद्या बालन आपला पती, निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत निर्माता गुनीत मोंगा यांच्या लग्न समारंभात गेली होती. विद्या बालन उपस्थित असेलेल्या मीडियासमोर फोटोसाठी पोझ देत असताना एका व्यक्तीने तिची साडी मागून ओढली.
विद्या बालन नुकतीच आपल्या पतीसोबत निर्माता गुनीत मोंगा यांच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी गेली होती. ती आत जात असतानाच पापाराझींनी तिच्यासमोर गर्दी केली त्यामुळे अभिनेत्री मीडिया आणि पापाराझींसमोर पोज देण्यासाठी गेली. मात्र त्याचवेळी अचानक कोणीतरी तिच्या साडीचा पदर ओढला.

विद्या मीडियासमोर येताच तिच्या बाजूने एक व्यक्ती बाहेर आली, त्यानंतर अचानक तिच्या साडीचा पदर ओढला गेला. हे सर्व इतके अचानक झाले की विद्यालाही काय झाले ते समजले नाही आणि तिला धक्का बसला.

यानंतर विद्या बालनने कॅमेऱ्यासमोर पाठ फिरवली आणि मग पाठ करुन आपली साडी व्यवस्थित केली. विद्या बालनची साडी जवळजवळ सुटली होती, जी तिने पटकन सावरली आणि नंतर कॅमेऱ्यासमोर पोज दिली. हा सर्व प्रकार तिच्या पतीसमोर घडला. खरेतर त्याच पार्टीत आलेला एक व्यक्ती सिद्धार्थ रॉय कपूरशी हस्तांदोलन करत असताना त्याच्या हातात साडीचा पदर अडकला आणि यामुळे विद्या समोरच्या उप्स मुमेंटची बळी ठरली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


मात्र हा सर्व प्रकार तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो क्षणार्धात व्हायरल देखील झाला. त्यावेळी विद्याचा पती एक रागीट लूक देत होता. जसेकी त्याला या सर्व गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. त्याच्या अशा वागण्यामुळे युजर्सनी त्याला ट्रोल केले.

तो व्हिडिओ पाहून काहींनी कमेंटमध्ये लिहिले की, हिच्या पतीला तिथे काय झाले काय नाही याची जराही पर्वा नाही. त्याचवेळी, दुसर्‍या युजरने लिहिले – नवरा दुस-याच दुनियेत आहे, काही फरक पडला नाही, भावा थोडी काळजी दाखव, ती तुझीच आहे. तर काहीजण विद्याच्या प्रसंगावधानतेचे कौतुक करत आहे. व सिद्धार्थला तिची माफी मागण्यास सांगत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.