Headlines

एका रात्रीचा किती रेट असे विचारणाऱ्या व्यक्तीला अभिनेत्रीने काय सांगितले बघा !

भारतामध्ये चित्रपटानंतर सगळ्यात जास्त पाहिले जातात ते म्हणजे डेली सोप. टीव्हीवर चालणाऱ्या डेली सोप आणि त्यातील पात्र लोकांच्या मनावर चांगलीच राज्य करतात. असाच एक डेली सोप आहे जो गेली १४ वर्ष सातत्याने लोकांचे मनोरंजन करत आहे तो म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा.

या डेली सोप मधील प्रत्येक पात्राने लोकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. यातीलच एक पात्र आहे ते म्हणजे बबीता. जेठालालला तर बबीता आवडतेच , पण आपल्या अभिनयाने बबीता ने लोकांच्या मनावर देखील राज्य केले आहे. मुनमुन दत्ताने बबीता हे पात्र निभावले आहे.

इंडस्ट्री मधील एकूणच अभिनेते आणि अभिनेत्री सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असताना आपल्याला दिसतात. दर दिवशी आपले नवनवीन फोटो देखील ते पोस्ट करत असतात. बबीता म्हणजेच मुनमुन देखील नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असते.

या फोटोंना लोकांची चांगलेच पसंती मिळते यावर अनेक कमेंट देखील केल्या जातात ज्यामध्ये काही वाईट कमेंट असतात तर काही चांगल्या. बरेचदा आपण असे पाहिले आहे की अनेक अभिनेते अभिनेत्री त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या कमेंट्सना इग्नोर करतात. पण बबीता मात्र तसं करत नाही, ती या कमेंट्सना खडसावून उत्तर देते.

कमेंट्सना बबीता ने दिले चांगलेच उत्तर – २०१८ मध्ये मुनमुनने तिच्या फेसबुक अकाउंटवर पिवळ्या रंगाचा घागरा घातलेला फोटो पोस्ट केला होता. हा फोटो शेअर केल्यानंतर लोकांनी तिचे भरपूर कौतुक केले. या फोटोवर अनेक कमेंट्स देखील आल्या ज्यामध्ये एकाने तिला विचारले होते एका रात्रीचा काय रेट आहे.

यावर मुनमुनने जे उत्तर दिले त्यामुळे त्या माणसाची पुन्हा अशी कमेंट करण्याची हिंमत होणार नाही. मुनमुन या कमेंटला घाबरली नाही किंवा तिने इग्नोर केले नाही तर तिने त्या माणसाला नामर्द म्हणून त्याला बरंच काही बोलली. मुनमुनने सांगितलं त्या व्यक्तीला ब्लॉक करण्याआधी मला त्याची चूक दाखवून द्यायची होती आणि त्याला सगळं ऐकवायचं होतं त्यामुळेच मुनमुन्या आधी त्याला भरपूर काही ऐकवलं आणि मग त्याला ब्लॉक केलं.

मुनमुन दत्ता मूळची वेस्ट बंगालची आहे. ती एक अभिनेत्री आणि मॉडल आहे. मुनमुन ने लहानपणी आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी चाइल्ड सिंगर म्हणून काम केले आहे. मुनमुनने अनेक फॅशन शो देखील केले आहेत. झी टीव्हीवरील हम सब भारती या मालिकेपासून तिने तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली.

यानंतर कमल हसन यांच्या मुंबई एक्सप्रेस या चित्रपटात तिने काम केले आहे. हा तिचा पहिला चित्रपट होता. २००६ मध्ये आलेला चित्रपट हॉलिडे मध्ये देखील मुनमुनने काम केले आहे. मुनमुनच्या अभिनयाचे आज सगळीकडेच राहते आहेत. तारक मेहतामध्ये काम करायला लागल्यापासून मुनमुनला बबीता म्हणूनच सगळीकडे ओळख मिळाली.

चित्रपटांपेक्षा मुनमुनला टीव्ही शोजमधून जास्त ओळख मिळाली. मुनमुनला बेस्ट एक्ट्रेस इन सपोर्टिंगसाठी इंडियन टेलिव्हिजन अकॅडमीचा अवॉर्ड देखील मिळाला आहे. इंस्टाग्रामवर मुनमुन दत्ताचे ७.५ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. ती सतत तिचे नवनवीन फोटोज आणि व्हिडिओ तिच्या या अकाउंट वर शेअर करत असते. मुनमुनचे बरेचसे फॅन्स तिचे फोटो पाहण्यासाठी आणि तिच्याबद्दल अपडेट मिळवण्यासाठी तिच्या सोशल मीडिया अकाउंटला फॉलो करतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !