लग्नाआधीच मलायकाच्या प्रेग्नंन्सीच्या बातमीवर अर्जुन कपूर झाला व्यक्त म्हणाला … !

360

मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मलायका आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. सोशल मीडियावर दोघांचे फोटो नेहमी वायरल होत असतात. आता मलायका अरोरा प्रेग्नेंट असल्याची बातमी समोर येत आहे.

ऑक्टोबर महिन्यात ही बातमी त्यांनी लंडनमध्ये जवळच्या नातेवाईकांना दिली होती. मलायकाला अर्जुन आणि तिचे मूल हवे आहे. पण या बातमीवर अर्जुनची मात्र वेगळी रिऍक्टशन पाहायला मिळत आहे. मलायका आणि अर्जुन कपूर एकमेकांसोबत रिलेशनमध्ये आसल्याची बातमी त्यांनी मिडीयासमोर मान्य केली आहे.

प्रेग्नेंसीच्या बातमीवर अर्जुनची रिऍक्शन – अर्जुनने त्याच्या इंस्टग्राम स्टोरीवर मलायकाच्या प्रेग्नेंसिच्या बातमीबाबत एक नोट लिहिली होती. यामध्ये अर्जुन कपूरने त्याचे मत मांडले आहे. तो लिहितो, हे सगळे खूप खालच्या पातळीचे विचार आहेत.

तुम्ही हे सगळं खूप कॅज्युअली करताय. पण अशा बातम्या पसरवण अत्यंत अनैतिक आणि चुकीचं आहे. आम्ही येणाऱ्या बातम्यांकडे दुर्लक्ष करतोय म्हणून काय तुम्ही काहीही बातमी पसरवाल. ही बातमी खोटी असल्याचे अर्जुनने सांगितले आहे. आमच्या पर्सनल गोष्टींमध्ये शिरण्याची कोणीही हिम्मत करायची नाही.

घरातल्यांनी बातमी खोटी असल्याचे सांगितले – मलायकाच्या प्रेग्नेंसीच्या बातमी बाबत तिच्या घरच्या लोकांची रिऍक्शन आली आहे. मलायका अरोराच्या घरातल्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले, ही बातमी खोटी आहे. मलायकाच्या प्रेग्नेंट असल्याची खोटी बातमी सगळीकडे पसरवली जात आहे. ही फक्त एक अफवा आहे.

मलायका आणि अर्जुनची लवस्टोरी – मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बॉलिवूड मधले नेहमी ट्रेंडिंग असणारे कपल आहेत. ते देखील त्यांचे फिरायला गेलेले असतानाचे आणि इतरही फोटो नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. २०१६ मध्ये मलायकाने अरबाज खान सोबतच तिचं नातं तोडलं. त्यांच्या लग्नाला १९ वर्ष झाली होती.

मलायकाने हे नातं अर्जुन मूळे तोडलं होतं. अरबाज खान पासून वेगळी झाल्यानंतर ती अर्जुन कपूर सोबत रिलेशनमध्ये आली. मलायका आणि अर्जुन यांच्या वयामध्ये १२ वर्षांचा फरक आहे. अर्जुनच्या ३४ व्या वाढदिवसाच्या दिवशी मलायकाने त्यांचा एकत्र फोटो टाकून इंस्टग्रामवर दोघे रिलेशनमध्ये असल्याचे सांगितले होते.

सोशल मीडियावर बरेचदा आपल्याला मलायका आणि अर्जुनचे फोटो पाहायला मिळतात. कित्येक इव्हेन्ट आणि शोमध्ये दोघेही एकत्र जातात. ते दोघं मालदीवला फिरायला गेले असतानाचे फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यांच्या रिलेशन बाबत सगळ्यांना सांगण्या आधी देखील ते लपून एकमेकांना त्यांच्या घरी भेटायचे. आणि नंतर तर अनेकदा त्यांना डिनर डेट वर आणखी इतर ठिकाणी बाहेर फिरताना देखील पाहिले गेले. लॅकमे फॅशन वीकमध्ये दोघांनी एकत्र एन्ट्री घेतली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !