Headlines

माझा भाऊ माझ्या मैत्रिणीसोबत संबंध ठेवण्यासाठी … अभिनेत्री सोनम कपूरचा भाऊ अर्जुन कपूर बद्दल धक्कादायक खुलासा !

करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये अनेक सेलिब्रेटी येऊन आपल्या आयुष्यातील अनेक गुपिते करणसोबत शेअर करतात. या शोचा प्रत्येक सीजन खूप गाजला.

या शोच्या ७ व्या सीजनमध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि सोनम कपूर ही भावा-बहिणीची जोडी आली होती. करणने त्यांना जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरे या दोघांनीही अतिशय रंजक पद्धतीने दिली होती.

सोनम कपूरने उघडले अर्जुन कपूरची गुपिते – कॉफी विथ करणमध्ये करणने सोनम आणि अर्जुनला अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी दोघांनीही आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. शोमध्ये करणने सोनमला विचारले की,

अर्जुनने तुझ्या मैत्रिणींसोबत कधी रोमॅण्टिक संबंध ठेवले आहेत का…यावर सोनम म्हणाली माझ्या सर्व भावांचे माझ्या मैत्रिणींशी संबंध होते. सोनमचे हे उत्तर ऐकून अर्जुन लगेच म्हणाला की, कशी बहिण आहेस तू आम्हा सर्व भावांबद्दल हे काय बोलत आहेस.

मलायकाच्या बाबतीत अर्जुनने सांगितले गुपित – याच शोमध्ये करणने अर्जुनला, तू मलायकाचा नंबर तुझ्या फोनमध्ये कोणत्या नावाने सेव्ह केलायस असा प्रश्न विचारला. यावर अर्जुन म्हणाला की, मला तिचे नाव खूप आवडते त्यामुळे माझ्या फोनमध्ये तिचा नंबर मलायका या नावानेच सेव्ह आहे.

अशाच प्रकारे अनेक प्रश्न उत्तरे या शोमध्ये विचारली गेली. भावा बहिणीच्या या एपिसोडला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !