Headlines

जुळ्या बहिणींसोबत लग्न करणाऱ्या तरुणाची धक्कादायक माहिती उघड, वधूपक्ष चिंतेत !

एकाच मांडवात दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत लग्न केलेल्या लग्नाचा व्हायरल व्हिडीओ आठवतोयना.. हे लग्न जोरातच गाजलं अगदी सोशल मीडियावरही.. पण जुळ्या बहिणींसोबत लग्न करणं सोलापुरातील तरुणाला चांगलं आंगलट आलंय.

या विवाहाची आता महिला आयोगाने दखल घेतली असून याबाबतची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यांनी याबाबतचे ट्विट देखील केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील अतुल नावाच्या युवकाने शुक्रवारी कांदिवलीतील जुळ्या बहिणींसोबत विवाह केलाय.

पोलीस चौकशीत या तरुणाचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे मुलीकडच्यांचेही धाबे दणाणले असणार. दोन जुळ्या बहिणींसोबत संसार थाटण्याची स्वप्नं पाहणाऱ्या अतुल अवताडेचं आधीच एक लग्न झालेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला एक नवीन वळण लागणार आहे.

अतुलच्या पहिल्या पत्नीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. राज्य महिला आयोगाकडे त्याच्या पत्नीने दाद मागितली आहे. त्यामुळे आता अतुल सोबतच त्या जुळ्या बहिणींवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. आता पुन्हा नव्याने हे प्रकरण गाजणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !