उर्फी जावेदच्या या ड्रेसवर एकाने केली ती कमेंट, ती म्हणाली घरी जाऊन तुझ्या आया बहिणीच्या …. , पहा व्हिडीओ !

bollyreport
2 Min Read

उर्फी जावेद हे एक असे नाव आहे जिचं लूक, फॅशन सेन्स, स्टाइलिंग, मेकअप, केस, स्टाइल सगळं काही वेगळं दिसतं.फॅशन इंडस्ट्रीत उर्फीने स्वताचे वेगळे नाव कमावले आहे. ती कोणतेही आणि कसेही कपडे भरपूर आत्मविश्वासाने घालते.

सोशल मीडियावर तिच्या नावाची नेहमीच चर्चा असते. उर्फी जावेद ही पापाराझींची आवडती आहे. ती अनेकदा त्यांच्यासोबत मजा मस्करी करत फोटोसाठी त्यांना हॉट पोज देत असते.पण यावेळी मात्र ती फोटोग्राफर्सवर इतकी भडकली की, तिने रागात त्यांना खडेबोल सुनावले.

उर्फी अनेकदा तिच्या चित्र-विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर उर्फीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती खूप भडकलेली दिसत आहे. उर्फी एका इव्हेंटमध्ये हिरव्या रंगाचा बॅकलेस ड्रेस घालून गेली होती. त्यावेळी तिने पापाराझींना फोटोसाठी पोजसुद्धा दिल्या पण कोणीतरी तिला तिच्या कपड्यांवरुन काहीतरी बोलले त्यामुळे ती खूप भडकली.

व्हिडिओमध्ये उर्फी रागाने म्हणताना दिसत आहे की, जर तुम्हाला फक्त कपड्यांबद्दल कमेंट करायची असेल, तर तुमच्या मैत्रिणी आणि आई आणि बहिणींच्या घरी जाऊन नका. आजनंतर कोणीही माझ्या कपड्यांवर कमेंट करणार नाही. मी हे सहन करणार नाही. मी तुमचा खूप आदर करते पण त्या बदल्यात मला हे मिळत आहे.

यानंतरही उर्फीचा राग कमी झाला नाही आणि ती म्हणाली की, मी झलकच्या सेटवर आले होते तेव्हा तुमच्यापैकी कोणीतरी एकजण म्हणाला होता की आज हिने व्यवस्थित कपडे घातले आहेत. यानंतर उर्फीमध्ये आपल्या फोनमधील तो आवाज सगळ्यांना ऐकवला आणि ती हा आवाज कोणाचा आहे, इतकं सांगा असं म्हणू लागली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


या व्हिडिओमुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे आणि आमच्या आई आणि बहिणी असे कपडे घालत नाहीत असे चाहते म्हणत आहेत. तर काहींनी तू कपडे कुठे घालतेस असे कमेंटमध्ये विचारले आहे. तर एकाने कमेंटमध्ये ती किती संस्कारी आहे, भलेही अंगावर कपडे नसले तर डोक्यावर पदर तिने आठवणीने घेतला असे म्हणत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.