बॉलीवूड मधील हिरोइन्स आणि त्यांची फिटनेस याबद्दल नियमित चर्चा असते. बॉलीवूड मध्ये अशा काही हीरोइन आहेत ज्या एव्हरग्रीन आहेत. आणि च्या सतत चर्चेत असतात. शिल्पा शेट्टी हे त्यातीलच एक नाव आहे. शिल्पा शेट्टीला तिच्या डान्समुळे, अभिनयामुळे, आणि फिटनेसमुळे ओळखले जाते. शिल्पा शेट्टीने चित्रपटांमध्ये काम करून लोकांचे मनोरंजन केलेच पण त्यासोबतच फिटनेसमुळे देखील सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले. शिल्पा शेट्टीच्या फिटनेस बाबतच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असतात.
शिल्पा शेट्टी स्वतः सोशल मीडियावर भरपूर ॲक्टिव्ह असते. ती नेहमी योगा आणि फिटनेस बाबतचे तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्या मधून तिच्या फॅन्सला देखील ती फिट राहण्याचा सल्ला देत असते. शिल्पा शेट्टीचा फॅशन सेन्स देखील तितकाच चांगला आहे.
तिची ड्रेसिंग स्टाईल तिच्या फॅन्सला देखील भरपूर आवडते. शिल्पा शेट्टीचे फॅन्स तिच्या नवीन लुकची नेहमी वाट पाहत असतात. एवढे वय असूनसुद्धा शिल्पा शेट्टी आजही तितकीच सुंदर आणि फिट आहे. त्यामुळेच आजही तिची फॅन फॉलोईंग वाढत आहे.
शिल्पा शेट्टीचे योगा व्हिडिओ तर नेहमी आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीच्या योगा पासून ते अगदी ड्रेसिंग सेन्स पर्यंत सगळ्यावर चर्चा होत असतात. शिल्पा शेट्टी कोणत्या इव्हेंटला गेली, की तिच्या फिटनेस आणि बोल्डनेस बाबत नेहमीच चर्चा होते. शिल्पा सगळ्याच ड्रेसमध्ये खूप हॉट दिसते. तिच्या ड्रेसिंग सेंसचे तर लोक दिवाने आहेत.
शिल्पा शेट्टी कोणत्याही पार्टीला गेली की सहज सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेते. हल्लीच तिला एका पार्टीमध्ये पाहिले गेले होते. ज्यामध्ये तिने लाल रंगाचा बॅकलेस आणि ऑफ शोल्डर गाऊन घातला होता. या ड्रेसमध्ये शिल्पा शेट्टी खूपच हॉट दिसत होती. शिल्पा शेट्टीचा हॉटनेस आणि बोल्ड अंदाज लोकांना तिच्या प्रेमात पडायला भाग पाडतं. या रेड गाऊन लूकवर देखील शिल्पाला अनेक कॉम्प्लिमेंट मिळाळ्या. या वेळेचे शिल्पाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत.
बाजीगर चित्रपटात काम केल्यानंतर शिल्पाला तिची खरी ओळख मिळाली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्डसाठी दोनदा नॉमिनेशन मिळाले. त्यानंतर तिने मे खिलाडी तू अनाडी, धडकन, फिर मिलेंगे, लाईफ इन मेट्रो यासारख्या अनेक चित्रपटात काम केले.
शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर जेवढी ऍक्टिव्ह आहे तेवढीच ऍक्टिव्ह ती तिच्या पर्सनल लाईफमध्ये देखील आहे. शिल्पा शेट्टीने एच’आ’य’व्हि लोकांसाठी देखील काम केले आहे. फिर मिलेंगे हा चित्रपट देखील अशाच स्टोरीवर आधारित होता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !