Headlines

मला तुझे बॉ* आवडतात … या कॉमेंटवर तापसीने दिले खतरनाक उत्तर, बघा !

बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रोल होणे आता सामान्य गोष्ट झाली आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत त्यांचे कपडे, रिलेशनशिप, ब्रेकअप , त्यांचे शरीर यांमुळे ट्रोल केले जाते. आता या ट्रोलिंगचे प्रमाण इतके वाढले आहे की, अभिनेत्री या सर्व प्रकाराला उत्तर देत बसत नाहीत. पण काही अशाही अभिनेत्री आहेत ज्यांनी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देऊन त्यांचे तोंड बंद केले.

अभिनेत्री तापसी पन्नूने आतापर्यंत तमिळ, तेलुगू, मल्याळमसोबतच बॉलिवूड इंडस्ट्रीतही काम केले आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ती सॉफ्टवेअर प्रोफेशनल होती. तापसी पन्नूने फेमिना मिस फ्रेश फेस आणि सेफी फेमिना ब्युटीफुल स्किन हे किताब जिंकले आहेत. तापसीने चश्मे बद्दूर या चित्रपटातून 2013 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याआधी ती साऊथची नावाजलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जायची.

तिने आपल्या करीअरची सुरुवात तमिळ चित्रपटातून केली होती.यानंतर ती कांचना या चित्रपटात दिसली. बेबी, नाम शबाना आणि पिंक यांसारख्या चित्रपटांमुळे तापसी पन्नूला बॉलिवूड इंडस्ट्रीत वेगळी ओळख मिळाली. तापसी आपल्या सडेतोड बोलण्यामुळे प्रसिद्ध आहे.

काही दिवसांपूर्वीच एका युजरने तिच्या फोटोवर तुझ्या शरीराचे अवयव मला खूप आवडतात अशी अश्लील कमेंट केली होती. तापसीने या कमेंटवर मौन न बाळगता त्याला उत्तर दिले, ती म्हणाली, “अरे वाह! मला पण खूप आवडतात. तुमचा आवडता कोणता भाग आहे? मला माझा मेंदू आवडतो.

तापसीच्या या उत्तराने तिचे चाहते खूप खूश आहेत आणि तिचे उत्तर खूपजण रिट्विट करत आहेत. तापसीच्या उत्तरावर कमेंट करताना, तिच्या एका चाहत्याने लिहिले की, तापसी सायन्सची विद्यार्थिनी आहे. ट्रोलने Cerebrumचा अर्थ जाणून घेण्यासाठी गुगल केले असेल.

तापसीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, काही दिवसांपूर्वीच ती शाबाश मिठूमध्ये दिसली होती. याशिवाय ती लवकरच ‘जन गन मन’, ‘दोबारा’, एलियन आणि ब्लर या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यासोबतच ती लवकरच ब्लर या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. ही वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म zee5 वर स्ट्रीम केली जाणार आहे. यासोबतच ती दुनकी की या चित्रपटात पहिल्यांदाच शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !