बॉलिवूडमध्ये अनेकदा जोड्या जुळतात तुटतात हे प्रकार चालूच असतात. यातील काही स्टार असे देखील असतात ते फक्त ज्यांच्यासोबत कंफर्टेबल असतात अशाच अभिनेत्रींसोबत काम करू इच्छितात. पण अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांच्यासोबत काम करण्यासाठी अभिनेते थोडे कचरतात. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे रेखा. रेखा अनेक दशकांपासून बॉलीवूड प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आजच्या काळात जरी रेखा अभिनयापासून दूर असली तरी वेगवेगळ्या इव्हेंट किंवा सोशल मीडिया वरून ती चर्चेत असते.
तर दुसरीकडे आहे बॉलीवूड चा परफेक्शनिस्ट अमीर खान. जो वर्षातून एकच चित्रपट करून धमाल उडवून देतो. हे दोन्ही स्टार बॉलिवूडमध्ये अनेक दशकांपासून काम करत आहे मात्र आजतागायत कधीच या दोघांनी एकत्र चित्रपटांमध्ये काम केले नाही. याचे कारण म्हणजे आमीर खानने स्वतः रेखा सोबत चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. चला तर जाणून घेऊ नक्की काय होते यामागील कारण.
अमीर खानने खूप आधीच रेखा सोबत स्क्रिन शेअर करण्यास नकार दिला होता. कारण रेखाचे सेट वरील वागणे अमीर ला खूप नकारात्मक वाटायचे. ही घटना आमीर खानच्या वडिलांच्या सेटवर झाली होती. मिळालेल्या बातमीनुसार आमीर खानला रेखाचे कामाप्रती चे वर्तन अजिबात आवडायचे नाही. ८० आणि ९० च्या दशकातील सुपरस्टार असणारी रेखा कामासाठी भरपूर दाम मागायची. प्रेक्षकांमध्ये सुद्धा तिच्या या गोष्टींची चर्चा अनेकदा व्हायची.
रेखा ची वाढती सफलता पाहून आमीर खानचे वडील ताहीर हुसैन यांनी रेखाला त्यांच्या लॉकेट या चित्रपटासाठी साइन केले. या चित्रपटाच्या सेटवर रेखाच्या नखऱ्यां सोबतच तिच्या वाईट वर्तणुकीचे आमीर खानने खूप बारकाईने निरीक्षण केले होते. चित्रीकरणावेळी आमिर खानने रेखाची काम करण्याची पद्धत, सेटवर वेळेत न येण्या जाण्याची सवय, काम करताना स्वतःच्या मर्जीने काम करणे या सर्व गोष्टी पाहिल्या होत्या. तिच्या सर्व सवयीमुळे चित्रपट बनवण्यास खूप अडचणी येत होत्या.
याच कारणामुळे अमीरला रेखाचे वर्तन अजिबात आवडले नाही त्यामुळे पुढे कधीच रेखा सोबत काम न करण्याचा निर्णय त्याने घेतला. असे म्हटले जाते की रेखाने तिच्या चित्रपटा प्रती कधीच इमानदारी बाळगली नाही. आणि आपल्याला अमीर खानचे त्याचे चित्रपटाप्रतिचे प्रेम आणि जिद्द तर ठाऊकच आहे. याच कारणामुळे आमीर खानला बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. मात्र जेव्हा अमीर आणि रेखा एकत्र दिसले त्यावेळी अमीर नेहमीच रेखाचा मान ठेवायचा.
Bollywood Updates On Just One Click