Headlines

महाराष्ट्रातील शेतकऱ्याला नवीन अडचण, टोळधाड करतेय पीक फस्त, काय आहे टोळधाड जाणून घ्या !

संपूर्ण जगभरात कोरोनाव्हायरस चे संकट घोंगावत असताना भारतात आता एक नवे संकट दाखल झाले आहे. हे संकट म्हणजे टोळधाड! देशात आधीच कोरोनाव्हायरस मुळे नागरिक त्रस्त असताना या नव्या संकटामुळे सर्व जण चिंतेत पडले आहेत. कोरोना चे संक्रमण संक्रमण रोखण्यासाठी लॉक डाऊन घोषित करण्यात आला. या लॉक डाऊनचा मोठ्या प्रमाणावर फटका शेती उद्योगाला बसला कारण उद्योगधंदे तसेच वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यामुळे शेतमालाची ने-आण करणे तसेच ते विकणे यावर आभाळ आले. शेती व्यवसाय आधीच नुकसानात जात असताना या टोळधाडीमुळे शेतकऱ्यांना शेतीची चिंता ग्रासत आहे. इराण आणि पाकिस्तानातील बलुचिस्थान येथे जन्मलेले हे टोळ राजस्थानात दाखल होऊन इतर राज्यात घुसले आहेत.
हे टोळ मुंबईतील काही भागात सुद्धा घुसले असल्याची सुद्धा चर्चा आहे. त्या प्रकारचे काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसून येत आहे. मात्र या अफवा असल्याचे म्हटले जाते. तज्ञांच्या मते मागील २६ वर्षातील हा सर्वात मोठा टोळ हल्ला आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमधील पिकांच्या नासाडी नंतर आता ही टोळधाड महाराष्ट्रात दाखल झाली आहे. गेल्या काही दिवसात विदर्भातील चार ते पाच गावात या टोळ धाडीने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
ताशी १२ ते १६ किलोमीटर वेगाने ही टोळधाड पुढे सरकत आहे. या आकस्मिक हल्ल्यामुळे शेतकरी हादरून गेले आहेत. हे टोळ हिरव्या वनस्पती खात असून त्यांनी लाखोंच्या संख्येने पिकांचे नुकसान केले आहे. हे टोळ नाकतोड्याच्या जमातीतील टोळ असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. हे टोळधाड जगातील सर्वात जुने स्थलांतर करणारे कीटक असून यात ही वाळवंटी टोळधाड ही सर्वात विनाशकारी मानली जाते. आणि हीच वाळवंटी टोळधाड सध्या सर्व राज्यात घोंगावत आहे.
समुद्रात जेव्हा वादळ निर्माण होते त्यावेळचे वातावरण टोळ्यांच्या जन्मासाठी पोषक ठरते. ते इतक्या मोठ्या प्रमाणात असतात की कधीकधी या टोळांच्या टोळी मुळे सूर्यप्रकाश सुद्धा दिसत नाही. या टोळ धाडीच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी भारत सरकार दरवर्षी एक बजेट घोषित करते. नेहमी अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये टोळ धाड नियंत्रण मंडळाला जवळ त्यांचे कीटकनाशक असते. ही टोळधाड राजस्थान मार्गे मध्यप्रदेशातून महाराष्ट्रातील आस्ती, कारंजा, चांदूर बाजार येथे दाखल झाली. पूर्वी टोळ धाडी चा सामना करण्यासाठी विमानातून कीटकनाशकांची फवारणी केली जायची.
हे टोळ जमीनीवर बसता कामा नये कारण एकदा का ते जमिनीवर बसले कि ते जमीनीवरील सर्व हिरवळ नष्ट करून टाकतात. एका टोळाचे वजन साधारण दोन ग्रॅम इतके असते. हे टोळ स्वतःच्या वजनाइतकी हिरवळ फस्त करून टाकतात. एक किलोमीटरच्या एका थव्यात साधारण आठ ते नऊ कोटी टोळ असतात. चार कोटी टोळांचा एक थवा ३५००० माणसांना एका दिवसाला पुरेल इतके अन्न फस्त करतात.
अनेक राज्यांमध्ये सध्या मुग, उडीद, कापूस, भाजीपाला यांसारखे उन्हाळी पिके घेतली जात आहे. त्यामुळे या संकटा वर नियंत्रण न आणल्यास देशाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणूनच भारत सरकार विमानां सोबतच ड्रोन द्वारे कीटकनाशक फवारणी करण्याचा विचार करत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *