बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन तिचा येणारा चित्रपट शकुंतलादेवी मुळे सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाईल. सध्या कोरोनाव्हायरस चे संक्रमण रोखण्यासाठी लॉक डाऊन चालू असल्यामुळे सोशल मीडियावर कलाकारांचे वेगवेगळे फोटो व्हायरल होत असतात. आता या यादीत विद्या बालन चे नाव सुद्धा सहभागी झाले आहे.
नुकतेच विद्याचे बोल्ड फोटोशूट वाले फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी त्यांना इंडस्ट्रीमध्ये येऊन २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ट्विटर अकाउंट वर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये विद्या बालन चा हॉट आणि बोल्ड अंदाज पाहण्यास मिळतो.
या फोटोमध्ये ती बेडवर झोपलेली दिसते. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीचा असून यामध्ये विद्या फार सुंदर दिसत आहे. सध्या या फोटोला युजर्स खूप लाईक आणि शेअर करत आहेत. फोटोग्राफर डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर वर विद्या पहिल्यांदा २०११ मध्ये दिसली होती. त्यावेळी विद्याने टॉपलेस फोटोशूट केले होते. त्यानंतर २०१५ मध्ये न्यूड होऊन फोटोशूट करुन सर्व हद्दपार केल्या होत्या.
विद्याच्या नव्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास या चित्रपटात ती ह्यूमन कॉम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणितज्ञ शकुंतला देवी यांची भूमिका साकारणार आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ ने सांगितले की शकुंतलादेवी चित्रपट २०० देशांत आणि काही क्षेत्रातील खास मेंबर साठी विशेष रूपात प्रीमियर केला जाईल.
या चित्रपटाची गोष्ट शकुंतलादेवी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. शकुंतला देवी या काही सेकंदातच कठीणातले कठीण गणित कॅल्क्युलेशन करून सांगू शकतात. या चित्रपटात विद्या सोबत सान्या मल्होत्रा सुद्धा काम करत आहे. सान्याने या चित्रपटात शकुंतला देवी यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. यांच्याव्यतिरिक्त अमित साध आणि जिस्सू सेनगुप्ता हेसुद्धा या चित्रपटातील महत्त्वाचा हिस्सा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन अनु मेनन यांनी केलं आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
Bollywood Updates On Just One Click