Headlines

घरातील प्रत्येक गोष्टी लिलावात गेलेल्या पाहून खूप रडला होता टायगर श्रॉफ, घर सावरण्यासाठी सलमान खानने केली मदत !

टायगर श्रॉफ हा सध्याच्या काळातील बॉलिवूडमधील सुपरस्टार आहे. बॉलीवूडमधील कलाकारांमध्ये टायगर ची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. परंतू इथपर्यंत पोहोचण्यासाठी टायगर श्रॉफ ने अथक परिश्रम घेतले. आजच्या घडीला इतर सुपरस्टारकडे असतात तसंच गाडी, बंगला व अन्य सर्व सोयीसुविधा टायगर श्रॉफ कडे आहेत. परंतु एका असा होता जेव्हा एका सुपरस्टारचा मुलगा असून देखील टायगर श्रॉफ कडे यामधील काहीच नव्हते.

एका मीडिया रिपोर्टनुसार जेव्हा टायगर श्रॉफ अकरा वर्षांचा होता तेव्हा त्याच्या डोळ्यांदेखत त्याच्या वडिलांनी कमवलेल्या संपत्तीचा लिलाव होत होता. डोळ्यांसमोर स्वतःच्या घरातील सर्व सामान जाताना पाहून टायगर श्रॉफ खूप रडला. अगदी गाड्यांपासून ते तो झोपत असलेला बेड पर्यंतच्या सर्वच गोष्टी या लिलावात गेल्या. तेव्हाच टायगरने प्रतिज्ञा घेतली की तोहे गेलेले सामान पुन्हा एकदा मिळवून त्याच्या आईवडिलांकडे सुपुर्त करणार.
खरेतर टायगर श्रॉफ चे वडील जॅकी श्रॉफ ने एका चित्रपटांमध्ये खूप पैसे लावले होते. या चित्रपटाचे नाव होते बूम. त्यावेळी या चित्रपटाचा खूप चर्चा झाल्या होत्या. असे म्हटले जात होते की हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरेल. या चित्रपटातून कॅटरीना कैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन सुद्धा होते.

मोठमोठ्या स्टार सोबत बनलेल्या या चित्रपटाचे बजेट सुद्धा खूप भरभक्कम होते. ज्यावेळी हा चित्रपट बनवला जात होता त्याच वेळी त्याचे बजेट चार करोड रुपयांपर्यंत गेले होते. मात्र संपूर्ण चित्रपट बनेपर्यंत तो २२ करोड रुपयांपर्यंत पोहोचला. या चित्रपटाचे लोकेशन खूप जबरदस्त होते. मोठ मोठ्या महागड्या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रिकरण केले गेले होते. पटाचे दिग्दर्शक एनआरआई होते. अशातच जितके दिवस चित्रपटाचे शूटिंग चालू होते तितके दिवस सर्वजण फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते.

या चित्रपटाचे प्रमोशन देखील ग्रॅण्ड पद्धतीने केले होते त्यामुळे त्या चित्रपटाची क्रेझ खूप झाली होती. मात्र जसा चित्रपट प्रदर्शित होण्याचा दिवस जवळ आला तसा तो चित्रपट ऑनलाईन लीक झाला. याचा धक्का जॅकी श्रॉफना खूप मोठा बसला. तो चित्रपट झाल्यामुळे या चित्रपटाच्या डिस्ट्रीब्युटर्सनी काढता पाय घेतला. तरीही जॅकी श्रॉफ ने ठरवले काहीही झाले तरी हा चित्रपट प्रदर्शित करायचा. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी त्यांनी अनेक लोकांकडून उधार घेणे चालू केले. त्यांना असे वाटले की हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना चांगला नफा होईल ज्यामुळे त्यांनी घेतलेले कर्ज फेडले जाऊ शकेल.

मात्र याच्या बरोबर उलटे झाले बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच आपटला. तो चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे जॅकी श्रॉफ ना खूप मोठे नुकसान झाले. ते कर्जा मध्ये बुडू लागले. देणेकरी पैसे मागण्यासाठी दारावर येऊ लागले. अमिताभ बच्चनने सुद्धा जॅकी श्रॉफ कडे त्यांची फी मागितली तेव्हा अमिताभ बच्चन यांना जॅकी श्रॉफने पैसे उधार घेऊन त्यांची फी दिली. त्यानंतर उर्वरित पैसे फेडण्यासाठी जॅकी श्रॉफना स्वतःचा फ्लॅट विकावा लागला. जॅकी श्रॉफनी साजिद नाडियावाला कडून सुद्धा पैसे उधार घेतले होते. मात्र ते पैसे सुद्धा त्यांना फेडता आले नाही. त्यावेळी साजिदने जॅकी श्रॉफना लीगल नोटीस पाठवण्याची धमकी दिली.

त्यावेळी सलमान खानने येऊन मध्यस्थी केली आणि साजिद नाडियावाला यांना प्रेमाने समजावले. त्यानंतर टायगर श्रॉफ ने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. टायगर चा पहिलाच हिरोपंती हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. त्यावेळी टायगरने त्याची पहिली कमाई त्याच्या आई-वडिलांना दिली आणि ही तुमच्यासाठी असे सांगितले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *