अवघ्या ४६ वर्ष वयात अभिनेते पुनीत राजकुमार आपल्या कुटुंबियांसाठी सोडून गेले तब्बल एवढ्या करोड रुपयाची संपत्ती !

bollyreport
3 Min Read

कन्नड चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार यांनी ४६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे आ’क’स्मि’क निधन झाले. पुनीत राजकुमार हे एक चित्रपट अभिनेता, निर्माता, गायक असून ते प्रामुख्याने कन्नड चित्रपटांमधील अभिनेते होते. पुनीत राज यांचा जन्म १७ मार्च १९७५ रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. पुनीत राज यांनी २००२ मध्ये अप्पू या कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. पुनीत यांनी बाल कलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम केले.

अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या अ’का’ली निधनाने संपूर्ण चाहते आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. २९ ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात हृ’दय’वि’का’रा’च्या झटक्याने या अभिनेत्याचे निधन झाले. आज सकाळी या अभिनेत्याला जिममध्ये हृ’दय’वि’का’रा’चा झटका आला. ते कन्नड चित्रपट उद्योगातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांचे चाहते त्यांना लाडाने अप्पू म्हणत. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कर्नाटकात शोककळा पसरली आहे. देशातील सर्व चित्रपटगृहे बंद करण्यात आली. चाहत्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी शहरातील काही भागात कलम १४४ लागू करण्यात आले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईही देखील रुग्णालयात पोहोचले.

पुनीत राजकुमार यांनी २९ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. वसंता गीता, एराडू नक्षत्रगालू, बेय्यादा हूवू मधील त्यांचा अभिनय उल्लेखनीय होता. पुनीत राजकुमार यांना चालिसुवा मोडगालू आणि येरौ नक्षत्रगल्लीसाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा कर्नाटक राज्य पुरस्कार मिळाला. २००२ मध्ये आलेल्या अप्पू या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले आणि हा चित्रपट प्रचंड गाजला होता. पुनीत राजकुमार एका चित्रपटासाठी २ ते ३ करोड इतके मानधन स्वीकारतात आणि चित्रपटाचा कमाईचा अर्धा हिस्सा देखील स्वीकारतात. ‘सुव्रत्थान’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटातील त्यांचा अभिनय देखील प्रेक्षकांना फार आवडला होता.

वेब पोर्टलवर प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, या दिग्गज कन्नड अभिनेत्याची एकूण संपत्ती १.५ दशलक्ष डॉलर्स आहे. ते सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक होते. विकिपीडिया, फोर्ब्स आणि बिझनेस इनसाइडर मधील अहवालानुसार, त्याची एकूण संपत्ती $1.5 दशलक्ष असल्याचे सांगितले आहे. त्यांचे दरमहा उत्पन्न ५० लाखापेक्षा अधिक आहे, तर त्यांचे वार्षिक उत्पन्न ५ ते ६ करोडच्या घरात आहे.

पुनीत राजकुमारने बालकलाकार म्हणून सिनेमाच्या दुनियेत प्रवेश केला होता; त्यामुळे ते अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करू शकले नाहीत. त्यांना एका खाजगी शिक्षकाच्या मदतीने शिक्षण पूर्ण करावे लागले. त्यांनी संगणक शास्त्रात डिप्लोमा केला. अभिनेत्याच्या पश्चात त्याच्या दोन मुली, पत्नी आणि मोठा चाहता वर्ग असा परिवार आहे. या एका अद्वितीय अभिनेत्याच्या आ’क’स्मि’क जाण्याने त्यांनी चित्रपट सृष्टीत न भरून निघणारी पोकळी निर्माण केली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.