Headlines

नवीन वर्षापासून ATM मधून पैसे काढल्यास लागणार एवढा चार्ज, जाणून घ्या नवीन नियम !

हा या वर्षाचा शेवटचा महिना चालु आहे. नवे वर्ष लवकरच सरु होईल. त्यामुळे नवीन वर्षांनुसार बॅंकेच्या नियमात सुद्धा आता बदल होणार आहे. यासंदर्भात आता इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक (आईपीपीबी) च्या ग्राहकांनासुद्धा झटका लागणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंकच्या खातेधारकांना एका लिमिट पेक्षा जास्त पैसे काढल्यास किंवा जमा केल्यास चार्ज द्यावे लागणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंकेत हा नियम १ जानेवारीपासुन लागु होणार आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक (आईपीपीबी) ने दिली ही माहिती – इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक (आईपीपीबी) मध्ये तीन प्रकारच्या सेव्हींग अकाउंट उघडले जाऊ शकते. बॅंकेत अन्य सुविधा सुद्धा मिळतात. येथे बेसिक सेव्हिंग अकाउंट मधुन दर महिन्याला ४ वेळा कॅश काढण्यावर कोणतेही चार्जेस् आकारले जाणार नाही. पण त्यानंतर काढल्या जाणाऱ्या पैशांवर प्रति २५ रुपये आकारले जातील.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक (आईपीपीबी) च्या बचत आणि चालु खात्यात १० हजार रुपये जमा केल्यास कोणतेही चार्जेस लागणार नाही. मात्र त्याहुन जास्त रक्कम जमा करायची असल्यास त्यासाठी चार्जेस द्यावे लागतील. बेसिक सेविंग अकाउंट व्यतिरिक्त दुसऱ्या सेविंग अकाउंट किंवा करंट अकाउंटमधुन २५ हजार रुपये काढल्यास कोणताच चार्ज लागणार नाही. मात्र फ्रि लिमिट नंतर पैसे काढल्यास कमीत कमी २५ रुपये चार्ज लागतील.

हे सर्व नियम १ जानेवारी २०२२ पासुन लागु होणार आहेत. GST/CESS यांचे चार्ज वेगळे असतील. १ ऑगस्ट २०२१ ला डोअर स्टेप बॅंकिंग शुल्काचे नवे नियम लागु करण्यात आले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !