Headlines

१ लिटर इंधनात किती लांब जातं विमान? आणि एका सेकंदात किती इंधन लागते, जाणून आश्चर्यचकीत व्हाल !

हल्ली हवाई प्रवास इतका सोपा आणि स्वस्त झाला आहे की, सामान्य माणूस सुद्धा ट्रेनमधून तासनतास प्रवास करण्यापेक्षा विमानाचा पर्याय स्वीकारताना दिसत आहेत. तरी सुद्धा काही लोकांसाठी विमानाने प्रवास करणे हे एखाद्या स्वप्नासारखंच आहे. देशात आजही अशी अनेक मंडळी असतील ज्यांनी जवळून सुद्धा विमान पाहिलं नसेल. तर अनेक अशी सुद्धा मंडळी असतील ज्यांनी विमानाने प्रवास तर केलाय,

मात्र त्याबाबद्दल त्यांना काही माहिती नसते. यांपैकीच अनेक लोकांच्या किंवा तुमच्या सुद्धा मनात कधी असा प्रश्न आला असेलच की, एवढं मोठं विमान चालवण्यासाठी किती इंधन खर्च होत असावं. काही लोकांना हे सुद्धा जाणून घ्यायची उत्सुकता आहे की, एका लिटरमध्ये विमान किती मायलेज देतं. चला तर मग आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत..

एका सेकंदाला खर्च होतं 4 लिटर इंधन : बोइंग 747 यांसारख्या विमानाला एक सेकंदाला 4 लीटर इंधन लागतं. 10 तासाच्या हवाई उड्डाणादरम्यान हे जवळपास 150,000 लीटर इंधन खर्च करू शकते. बोइंगच्या वेबसाईटनुसार बोइंग 747 एका किलोमीटर साठी 12 लीटर इंधन खर्च करते. तुम्हाला हे जरी कमी वाटत असलं तरी, बोइंग 747 ची प्रवाशी क्षमता ही 568 आहे. आणि त्यामानाने हे सामान्य समजलं जातं.

किती आहे बोइंग 747 चं मायलेज? एका बोइंग 747 मध्ये 12 लीटर इंधनात 500 लोक एक किलोमीटरचा प्रवास करत आहेत. याचाच अर्थ विमान प्रति व्यक्ती प्रति किमी 0.024 लिटर इंधन खर्च करत आहे. एखादी कार एक लिटर इंधनात साधारणपणे 15 किमी मायलेज देते.

म्हणून जर तुलना करायची झाली तर एका कारच्या तुलनेत बोइंग 747 मध्ये एका व्यक्तीचा प्रवास कारच्या तुलनेत चांगला मानला जातो. मात्र कारमध्ये जर चार लोक बसले तर तो पर्याय चांगला ठरू शकतो. मात्र आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, बोइंग 747, 900 किमी / तास या वेगाने उडतं.

इंधन खर्च होण्यामागे ही आहेत कारणं : विमान उड्डाणानंतर इंधन बचतीसाठी वेळोवेळी अनेक मार्ग अवलंबण्यात आले आहेत. यातील एक महत्वाचा मार्ग म्हणजे डायरेक्ट रुटिंग. म्हणजे विमान सरळ रस्त्याने घेवून जाणं. याशिवाय, इंधन जास्त खर्च होऊ नये म्हणून विमानाचा वेग निश्चित केला जातो, ज्यामुळे इंधन कमी खर्च होतं. इंधन खर्च होण्यामागे विमानाचं वजन महत्वाची भूमिका निभावत असतं. विमानाचं वजन जितकं कमी तितकं विमानाला कमी इंधन खर्च होतं.