Headlines

मुलगी आहे? घाबरू नका .. फक्त १३० रुपये जमा करा आणि मुलीच्या लग्नाला, शिक्षणाला मिळवा २७ लाख रुपये !

एकेकाळी दुय्यम स्थान मिळणाऱ्या मुलींना आताच्या काळात मात्र पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिले जाते. मुलींचे भविष्य उज्वल असावे. त्यांना पुढे कशाची कमतराता भासु नये यासाठी सध्या वेगवेगळया योजना राबवल्या जात आहेत. अशीच एक योजना एलआयसीने आणली आहे.

या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणापासुन ते त्यांच्या लग्नापर्यंतचे टेंशन तिच्या घरच्यांना राहणार नाही. या योजनेमुळे त्यांच्या उच्च शिक्षणासाठी तसेच करियरसाठी उपयोगी येणारे पैसे मिळतील. शिवाय त्यांचे लग्न सुद्धा धुमधडाक्यात होऊ शकेल. यासाठी केवळ तुम्हाला तुमच्या मुलीच्या नावाने थोडेफार पैसे गुंतवावे लागतील. या पॉलिसीचे नाव आहे LIC ची कन्यादान पॉलिसी ! या पॉलिसीमध्ये तेव्हा गुंतवणूक करू शकता जेव्हा मुलगी १ वर्षाची होईल.

मुलगी एक वर्षाची झाल्यावर तिच्या नावाने एलआयसी मध्ये पैशांची गुंतवणुक करता येते. या पॉलिसीची मिनिमम मॅच्युरिटी टाइम १३ वर्ष आहे. जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने रोज १३० रुपये म्हणजेच दर महिना ३९०१ रुपये जमा केलात तर तिला २५ वर्षांनी २७ लाख रुपये मिळतील.

जर कोणी ५ लाख रुपयांचा विमा केलात तर २२ वर्षे तुम्हाला दर महिना १९५१ रुपये भरावे लागतील. या विमाचा कालावधी पुर्ण झाल्यावर १३.३७ लाख रुपये म्यॅच्युरिटी रक्कम मिळेल. काही कारणास्तव ही पॉलिसी सुरु असतानाच विमा असलेल्या व्यक्तीचा मृत्यु झाला तर एलआयसी कडुन अतिरिक्त ५ लाख रुपये मिळतात. तसेच जर २२ ऐवजी २७ किंवा २८ वर्षांनी मॅच्युरिटी रक्कम काढलात तर तुम्हाला अधिक पैसे मिळु शकतात.

इन्कम टॅक्सकडुन मिळेल सुट – मुलींसाठी पॉलिसी घेणाऱ्या वडिलांचे वय १८ ते जास्तीत जास्त ५० वर्षे असणे आवश्यक आहे. तर मुलीचे वय कमीत कमी १ वर्षे असणे गरजेचे आहे. या योजनेत गुंतवणुक करणाऱ्यास इन्कम टॅक्स कडुन दीड लाख रुपयांपर्यंत सुट मिळते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !