Headlines

नात किंवा नातू करू शकतात का वडिलोपार्जित संपत्तीवर दावा, जाणून घ्या !

सु प्री म कोर्टाचे वकील डिके गर्ग यांच्या मते ९ सप्टेंबर २००५ मध्ये हिंदू उत्तराधिकार कायदा सुधारित करून त्यात मुलींना वडिलोपार्जित संपत्ती मध्ये समान हक्क देण्यात आले होते. त्यांनी सांगितले की त्यापूर्वी वडिलांच्या संपत्तीत मुलींना खूप कमी अधिकार मिळायचे.

त्यावेळी मुली फक्त वडिलांनी कमावलेल्या संपत्ती वरच दावा करू शकत होत्या. ते पण जर फक्त वडिलांचे नि ध न संपत्तीचे विभाजन न करता झाले असेल तरच. गर्ग यांनी सांगितले की मुलींना को प र्स न रचा दर्जा असूनही आतापर्यंत वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्ती मध्ये त्यांना अधिकार मिळायचा नाही.

को प र्स न रचा दर्जा म्हणजे मुलीला जन्मापासूनच संपत्तीवर मिळालेले हक्क. गर्ग यांनी सांगितले की सु प्री म कोर्टाने मुलींना वडिलांच्या संपत्तीत मिळणार्‍या अधिकारांमध्ये येणारी मोठी अडचण दूर केली आहे.
कोर्टाने स्पष्ट केले की हिंदू उत्तराधिकार कायद्यात बदल होण्याआधी जर मुलीच्या वडिलांचे नि ध न झाले असल्यास त्या मुलींना सुद्धा त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर अधिकार दाखवण्या पासून कोणीही वंचित करू शकत नाही.

याआधी उत्तराधिकार कायदा २००५ लागू होता मात्र सु प्री म कोर्टाच्या या निर्णयानंतर तो लागू करण्यात आला आहे. सु प्री म कोर्टाने आता या कायद्यात केलेल्या बदलावामुळे देशातील मुलींना त्यांच्या वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्ती मध्ये संपूर्ण हक्क मिळेल

आणि नातीला हवे असल्यास ती सुद्धा तिच्या आईच्या मृत्यूनंतर आईच्या वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत हक्क दाखवू शकते. हा हक्क त्यांना कायद्याने मिळाला आहे.

गर्ग यांनी सांगितले की कोर्टाचा निर्णय येण्याआधी २००५ मध्ये हिंदू उत्तराधिकार कायद्यात सुधारणा केल्यामुळे मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत को पा र्स न रचा दर्जा मिळाला मात्र ज्या मुलींच्या वडीलांचा हा कायदा लागू होण्यापूर्वी म्हणजेच ९ सप्टेंबर २००५ च्या आधी मृत्यु झाला होता त्या मुलींना या कायद्याचा लाभ मिळू शकत नव्हता.

पुढे ते म्हणाले की या आधी मुलगा नसल्यास मुलीचा मुलगा म्हणजेच भाचा त्या संपत्तीवर संपूर्ण दावा करायचे. म्हणजेच मुलगी तिच्या वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्ती मध्ये हक्कदार नव्हती कारण, ती कायद्याच्या आधीच्या तारखेत मोडते.
आता हा अडसर सु प्री म कोर्टाच्या निर्णयाने दूर झाला आहे. पुढे गर्ग म्हणाले वडिलांचा मृत्यू कधी ही झाला असला तरीही त्याचा मुलींच्या अधिकारावर कोणताच फरक पडणार नाही. यासोबत कोर्टाने हे सुद्धा सांगितले आहे की हा कायदा लागू होण्यापूर्वी जर मुलीचा मृत्यु झाला असल्यास तिची मुलं त्यांच्या आई तर्फे त्या संपत्तीवर दावा करू शकतात.

या विषयी मनामध्ये काही शंका असतील तर कायदे पंडिताची किंवा वकिलाची भेट घेऊन पुढील निर्णय घ्यावा. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !