Headlines

धन आणि सुख समृद्धीसाठी हे उपाय करून पहा, या उपायांनी घरामध्ये लक्ष्मी निवास करते, घरामध्ये होईल भरभराट !

आपले संपूर्ण जीवन सुखा समाधानात घालवावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी जो तो आपापल्या परिने रात्रंदिवस मेहनत करून पैसा कमवत असतो. आत्ताचे वैज्ञानिक युग असले तरीही या वैज्ञानिक युगात पौराणिक गोष्टींवर तथा हिंदू शास्त्रांवर विश्वास ठेवणारे काही लोक अजूनही आहेत.

धनदौलत संपन्न करण्यासाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे महत्त्वाचे असते असे शास्त्रात म्हटले आहे. पैशांची चणचण दूर करण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत. या लेखाद्वारे आज आम्ही तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तसेच तुमच्या घरातील पैशांची कमी दूर करण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत.

१) ज्या घरात साफसफाई नीट असते, घर स्वच्छ व नीटनेटके असते त्याच घरात लक्ष्मी वावर करते असे शास्त्रात म्हटले आहे. जेथे कचरा व घाणीचे स्वरूप असते तेथे देवी लक्ष्मी कधीच निवास करत नाही. त्यामुळे नेहमी तुमच्या घरात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी स्वच्छ साफ सफाई ठेवा.

२) रात्रीच्या वेळी स्वयंपाक घरात चुकूनही खरकटी भांडी ठेवू नयेत. ती भांडी रात्रीच स्वच्छ करून नीट ठेवून द्यावीत.
३) पैशांच्या नोटांना कधीही उष्ट्या हाताने स्पर्श करू नका किंवा पैशांच्या नोटा मोजताना थुंकीचा वापर करू नका. असे म्हटले जाते की उष्ट्या हाताने पैशांना स्पर्श केल्यास देवी लक्ष्मीचा अपमान होतो त्यामुळे देवी लक्ष्मी या घरात निवास करत नाही.

४) शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मी चा असतो असे शास्त्रांमध्ये म्हटले आहे. त्यामुळे शुक्रवारी घराच्या मुख्य दरवाजावर दीप ज्वलन करावे. ज्या घरात संध्याकाळच्या वेळी दिवा लावला जात नाही तेथे देवी लक्ष्मी थांबत नाही.
५) त्याचप्रमाणे दर शुक्रवारी सकाळी पूजा करते वेळी देवी लक्ष्मीचा फोटो ईशान्य दिशेला ठेवून तिची पूजा करावी त्यामुळे देवीचा आशीर्वाद तुमच्या सतत पाठीशी राहतो.

६) देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीयंत्रावर कमळाचे फुल अर्पण करावे आणि स्पटिक किंवा कमळाच्या पानाच्या माळांनी मंत्रांचा जप करावा असे केल्यास देवी लक्ष्मी सोबतच भगवान विष्णूची सुद्धा पूजा होते.

७) घरातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी देवघरात किंवा तिजोरीमध्ये महालक्ष्मी यंत्र ठेवा व त्याची दररोज पूजा करा.
८) देवी लक्ष्मीची पूजा करते वेळी तिला प्रिय असलेल्या शंख, कवडी, श्रीफळ या गोष्टींचा त्या पूजेत समाविष्ट कराव्यात.

९) तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहावा अशी जर तुमची इच्छा असेल तर रात्रीच्या वेळी दही व भाताचे सेवन करू नये. तसेच शुक्रवारी गरिबांना अवश्य दान करावे. दान करतेवेळी त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा वापर अधिक करावा.

१०) वास्तुशास्त्रानुसार कधीही केरसुणीला पाय लावू नये. असे केल्यास देवी लक्ष्मीचा अपमान होतो त्यामुळे तुम्हाला अनेक आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. याशिवाय केरसुणीने कुठल्याही जीवजंतूला मारणे किंवा त्यांना पळवून लावणे देखील अशुभ मानले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये जय लक्ष्मी माते लिहा. आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.