Headlines

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेत हा अभिनेता साकारणार ‘ज्योतिबा’ची भूमिका, या चित्रपटात आधी तुम्ही पाहिलं होत त्याला !

मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सध्या पौराणिक कथा मालिकांद्वारे दाखवण्याचा ट्रेंड सुरू आहे. गणपती बाप्पा मोरया, आई माझी काळुबाई, जय मल्हार यांसारख्या मालिकांमधून देवांचे महात्म्य वाहिन्यांनी सादर केले. कोठारे व्हिजनच्या जय मल्हार या मालिकेने टीआरपीच्या उच्चांक गाठला होता.

आता पुन्हा एकदा कोठारे व्हिजन स्टार प्रवाह वाहिनीवर एक नवीन पौराणिक मालिका घेऊन सज्ज झाले आहे. ही मालिका म्हणजे दख्खनचा राजा ज्योतिबा. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं. ही मालिका २३ ऑक्टोबर पासून संध्याकाळी ६:३० वाजता टीव्हीवर पाहता येईल.
या मालिकेत ज्योतिबाची भूमिका एक नवा अभिनेता साकारत आहे. या अभिनेत्या बद्दल या लेखातून आज आम्ही तुम्हाला थोडी माहिती देणार आहोत.दख्खनचा राजा जोतिबा. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं या मालिकेत ज्योतिबा ची भूमिका अभिनेता विशाल निकम साकारणार आहे.
विशाल ला विशू या टोपण नावाने हाक मारतात. अभिनेता विशाल निकम चा जन्म १० फेब्रुवारी १९९४ मध्ये झाला. तो आता २६ वर्षांचा झाला आहे. विशालचे शालेय शिक्षण एनएसव्ही विद्यालय, देवीकिंदी, खानापूर येथे झाले तर केडब्ल्यूसी कनिष्ठ महाविद्यालय येथे महाविद्यालयीन शिक्षण झाले.

मग विटा येथील बलवंत कॉलेजमधून विज्ञान बीएससी करून नंतर विशालने सांगली बाबूराव घोलप महाविद्यालय, नवी सांगवी, पुणे येथून विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी घेतली. अभिनयाव्यतिरिक्त विशाल ला क्रिकेट खेळणे, जिम, नृत्य, वाचनाचा छंद आहे. त्याच्या कुटुंबात व त्याचे आईवडील असे तिघेजण आहे.
विशाल ने मिथुन या मराठी चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. विशेष म्हणजे अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तो मुंबईतील कांदिवली मधील एका जिम मध्ये जिम ट्रेनर म्हणून काम करायचा. विशालने गोल्ड जिम इंडिया साठी मॉडेलिंग व मासिकासाठी चे शूट केले आहे.

त्यामुळे आता विशाल ज्योतिबा म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. पौराणिक मालिकेतील त्याची ही भूमिका तो कशी साकारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !