Headlines

ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात जन्मणाऱ्या मुली साक्षात असतात देवी लक्ष्मीचे रूप, जन्मापासून नशिबात लिहलेला असतो राजयोग !

घरात मुलीने जन्म घेतला तर साक्षात देवी लक्ष्मी शुभ पावलांनी आपल्या घरात येते असे म्हणतात. त्यामुळे ज्या ठिकाणी देवी लक्ष्मीचा वास असतो त्या घरावर तिची कायम कृपादृष्टी असते. म्हणूनच असे म्हटले जाते की, ज्या घरात मुलगी जन्मास येते त्या ठिकाणी भरभरून असतो. मुलगीही देवाकडे मागून मिळत नाही ही तर त्यासाठी नशीब असावे लागते.

ज्यांच्या नशिबात कन्यारत्नाचा लाभ असतो त्यांचे भाग्य नेहमीच उजळते. मग ती कोणत्याही महिन्यात जन्माला येवो. मुलगी ही साक्षात लक्ष्मीचे दुसरे रूप मानले जाते. आपल्या भारत देशात पुरुष प्रधान संस्कृती असली तरीही आताच्या युगात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतात. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे.

घराण्याला वारस म्हणून अनेक कुटुंब देवाकडे कुलदीपकाची मागणी करतात. मात्र असेही काही कुटुंब आहेत ज्यांना तीन चार मुले असून देखील ते एका मुलीसाठी तरसत असतात. ज्याप्रकारे मुलीशिवाय घर सुने असते त्याच प्रकारे स्त्रियांशिवाय हा समाज आणि ही सृष्टी अपूर्ण आहे. भाग्यलक्ष्मी च्या रूपात जन्मलेल्या मुली समाजाला ममता, स्नेह आणि प्रेमाची परिभाषा शिकवतात.

भारतात ज्योतिष शास्त्रावर अनेक जण विश्वास ठेवतात. आपले भाग्य आणि भविष्य ज्योतिष शास्त्र आणि अंकशास्त्र वरून समजते. ज्योतिषशास्त्रामुळे आपण कुठल्याही व्यक्तीविषयी किंवा त्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी जाणून घेऊ शकतो. आज आपण ज्योतिष शास्त्रा वरून कुठल्या महिन्यात जन्मलेल्या मुली या अधिक भाग्यशाली असतात हे जाणणार आहोत. कारण ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे की काही विशिष्ट महिन्यात जन्मणाऱ्या मुली या साक्षात देवी लक्ष्मीचे रूप असतात.

फेब्रुवारी महिना – ज्योतिष शास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्यात जन्मणाऱ्या मुली या साक्षात देवी लक्ष्मीचे रूप असतात. कारण या महिन्यात ग्रहांची चाल हे मुलींच्या आयुष्यात राज योग घेऊन येते. त्यामुळे या मुली भरपूर भाग्यवान असतात. तसेच त्यांच्या जीवनात पैसा अडक्याची काहीच कमी भासत नाही. या महिन्यात जन्मणाऱ्या मुली भरपूर मृदू आणि शांत स्वभावाच्या असतात. लग्नानंतर सुद्धा या मुलींच्या आयुष्यात भरपूर सुख-समृद्धी राहते.

एप्रिल महिना – ज्योतिष शास्त्रानुसार एप्रिल महिन्यात जन्मणाऱ्या मुलींनादेखील साक्षात देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. कारण यांच्या कुंडलीत ग्रहांचे चाल त्यांच्या आयुष्यात भाग्य उदयाचे किरण घेऊन येते. या मुलींच्या आयुष्यात कधीच पैशांची कमी भासत नाही. तसेच ज्या मुलासोबत या मुलींचा विवाह होतो त्याचे व त्याच्या कुटुंबाचे सुद्धा नशीब उजळते.

जून महिना – जून महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली या नशिबाने भरपूर धनवान असतात. या मुलींचा ज्या घरात जन्म होतो त्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा दृष्टी नेहमी राहते. त्यामुळे या मुलींच्या जन्मानंतर त्या घरातील धनदौलत वाढू लागते. या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली भरपूर समजदार असतात. आयुष्यात भरपूर यश मिळवण्यासाठी त्या खूप महिन्यात करतात. त्यामुळे या मेहनतीचे सुद्धा त्यांना चांगलेच फळ मिळते.

सप्टेंबर महिना – ज्योतिष शास्त्रानुसार ज्या मुलींचा जन्म सप्टेंबर महिन्यात होतो. त्यांच्या कुंडलीत चंद्र, बुध आणि शुक्र या तीन ग्रहांचे एकत्र मिलन होते. त्यामुळे या महिन्यात जन्मणाऱ्या मुली भरपूर भाग्यशाली आणि धनवान असतात. या मुलींकडे कुठल्याच गोष्टीची कमी नसते. शिवाय या मुलींचे विवाहदेखील धनदौलताने परिपूर्ण अशा घरात होतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.