Headlines

विष्णू आणि लक्ष्मीच्या कृपेने फक्त या उपायांनी घरात होईल भरभराट, कोणत्याच गोष्टीची राहणार नाही कमी !

पैशांची गरज नाही असा व्यक्ती या जगात शोधून सापडणार नाही. त्यामुळे प्रत्येक जण पैसे कमी होण्यासाठी प्रयत्न करत असतो. यात काहींच्या प्रयत्नांना यश येते तर काहींना अपयश भोगावे लागते. तुम्हाला धनसंपत्ती हवी असेल तर तुमच्या आचरणात सुद्धा चांगले बदल घडणे आवश्यक आहे. यासाठी तुमचे विचार चांगले असावेत, कर्म चांगले असावेत.

एकमेकांबद्दल चांगले चिंतावे. जेणेकरून तुम्हाला याबद्दल चांगले फळ मिळेल. ज्योतिष शास्त्रात सुद्धा धनप्राप्तीचे अनेक उपाय सांगितले आहेत. जे केल्यास तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे धनप्राप्तीचे काही चांगले उपाय सांगणार आहोत यांचा वापर केल्यास तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील. याशिवाय तुम्हाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपादृष्टी लाभेल.

धनप्राप्तीचे उपाय – तुमच्या घरात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी चा मोठा फोटो लावा. त्या फोटोची रोज नित्यनियमाने पूजा करा. याशिवाय दर शुक्रवारी विष्णू लक्ष्मी च्या मंदिरात जाऊन लाल रंगाचे फुल अर्पण करा. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपादृष्टी राहावे असे तुम्हाला वाटत असल्यास , तर देवी लक्ष्मी च्या फोटो समोर अकरा दिवस अखंड दिवा लावा.

या अकरा दिवसात अकरा मुलींना जेवण द्या. तसेच त्यांना एक नाणे आणि मेहंदी उपहार म्हणून द्या. शुक्रवारी दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून त्याने भगवान विष्णूंना अभिषेक घाला. शास्त्रानुसार हा उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.

रोज सकाळी लवकर उठल्यावर देवी लक्ष्मी आपल्या घरात येईल असा मनात विश्वास ठेवूनच उठावे. त्यासाठी तुम्हाला तुमचं घर स्वच्छ व नीटनेटके ठेवायचं आहे. तुमची अंघोळ झाल्यावर घरात सुगंधित वातावरण राहील याची काळजी घ्या.
गुरूवारच्या दिवशी सव्वा पाच किलो आणि सव्वा किलो गूळ घेऊन त्याच्या पोळ्या बनवा. या पोळ्या गुरुवारी संध्याकाळी गाईंना खायला द्या. हा उपाय सलग तीन गुरुवार करत रहा. तुम्ही जर हा उपाय योग्य प्रकारे केलात तर तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होईल.

जर तुम्ही शुक्रवारी पिवळ्या रंगाच्या वस्त्रात पाच कवड्या आणि थोडे केशर चांदीचे नाणे एकत्र बांधून तुमच्या तिजोरीत ठेवलात तर याचा तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. यासोबतच तुम्ही त्याच्यात हळदीच्या काही गाठी सुद्धा ठेवा. हा उपाय केल्यास लवकरच तुम्हाला त्याचा चांगला प्रभाव पाहण्यास मिळेल. तसेच तुमच्या जीवनातील पैशांच्या संबंधीत आर्थिक अडचणी दूर होतील.

तुमची पैसे ठेवण्याची तिजोरी नेहमीच पैशांनी भरलेली रहावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्या तिजोरीमध्ये 10 रुपयांच्या १०० नोटा ठेवून द्याव्यात. तसेच तुमच्या पाकिटात किंवा खिशात सुद्धा काही नाणी अवश्य ठेवा. यामुळे हळूहळू तुमच्याकडील‌‌ पैसा वाढत असल्याचा विश्वास तुम्हाला येऊ लागेल.

रोज नित्यनियमाने गाय, कुत्रा, कावळा यांना पोळी खायला द्या. शनिवारी जर तुम्ही कुत्रा ला चपाती खायला दिल्यास त्या चपातीला मोहरीचे तेल लावा. हा उपाय केल्यास तुम्हाला राहुल लवकरच धनलाभ होऊ शकतो आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद.