Headlines

लाखात एक बुद्धिमान व्यक्ती या दोन मधील फोटो मधील फरक सांगू शकतो, फोटो झूम करा उत्तर सापडेल !

ओळखा पाहू मी कोण? या कोड्यानंतर मग दोन चित्रांमधील फरक ओळखा हे खेळ अनेक जण लहानपणी खेळले आहेत. नंतरच्या काळात मोबाईलमध्ये गेम्समध्ये जस जशी प्रगती झाली त्याप्रमाणे मग मोबाईलमध्ये देखील हा खेळ आला. बुद्धीला खुराक देणारा असा हा खेळ आहे. बुद्धीला चालना देत फोटोमधील फरक ओळखणं हा एक उत्तम पर्याय आहे.

आतापर्यंत आपण असे अनेक प्रश्न सोडवले असतील. कधी कधी काही असे प्रश्न व कोडी येतात जी सोडवणं कठीण होऊन जातं. अनेक प्रयत्न करूनही ते सोडवलेच जात नाही. पण काही अगदी हुशार असतात ते नक्कीच सोडवतात. जर का आपण देखील स्वतःला या खेळात तरबेज मानता तर मग आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही फरक शोधा असलेली कोडी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहूया तुम्ही खाली दिलेल्या फोटो मधील फरक ओळखू शकताय का ?

आतापर्यंत आपण सोडवलेल्या अनेक कोड्यांपैकी ही कोडी नक्कीच अवघड असणार आहेत. वरील दोन्ही फोटोमध्ये एक मुलगी दाखवली आहे. पण दोन्ही फोटोमध्ये जेमेतेम सर्व काही सारखंच दिसत आहे. पण यात छोटासा फरक आहे जो तुम्हाला शोधून दाखवायचा आहे. यातील छोट्यातला छोटा फरक शोधून काढणे हेच आजचं आपलं मोठं आव्हान आहे.
चला तर मग शोधूया, थोडा ही वेळ न दवडता….. काय मग मित्रांनो सापडला का फरक? अनेकांनी खूप प्रयत्न केलेत पण ते यातील फरक शोधू शकले नाहीत. बघूया आपल्यापैकी कोण शोधू पाहतं आहे.

पुढील फोटो आहे अजय देवगण व त्याच्या बॅकग्राऊंड डान्सर्स यांचा. हे दोन्ही फोटो जेमतेम सारखेच दिसत आहेत. पण जर का आपण निरखून नीट पाहिले तर त्या दोनही फोटोमध्ये आपल्याला फरक दिसून येईल. चला तर मग पाहूया काय फरक आहे.  त्यातील फरक सांगणं थोडं अवघड आहे, पण काही हुशार लोक असतील त्यांनी लगेच शोधून काढले असतील. परंतु आपण नाही शोधू शकलात, काही हरकत नाही आपण पाहूया या फोटो मध्ये काय आणि किती फरक आहे ते !

तर पहिला फोटो होता त्या मुलीचा. त्या पहिल्या फोटोमध्ये तिच्या कानात इअर रिंग नाही आहे पण तेच दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या कानात इअर रिंग दाखवलं आहे. हा पहिल्या फोटोमधील फरक होता.

पुढील फोटो आहे अजय देवगण व त्याचामागील बॅकग्राऊंड डान्सर्सचा. या फोटोमध्ये ४ ते ५ फरक आपल्याला दिसून येतात. पहिला फरक आहे अजय देवगणने घातलेल्या शर्टचा. पहिल्या फोटोमध्ये शर्ट मधील टी – शर्ट आपल्याला दिसत आहे आणि तेच दुसऱ्या फोटोमध्ये फक्त शर्ट घातलेलं दाखवलं आहे.
नंतर अजयच्या बाजूचा निळा कुर्ता घातलेला माणूस आहे त्याची पहिल्या फोटोमध्ये पगडी वेगळ्या रानगाची आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये पगडी वेगळ्या रंगाची दाखवली आहे. तिसरा फरक आहे अजयचा मागे असलेला तपकिरी रंगाचाकुर्ता घातलेलया माणसाची मान दोन्ही फोटोमध्ये वेगवगेळी हालचाल करताना दाखवले आहे.

चौथा फरक आहे, अजयच्या डाव्या पायाच्या मागे न दिसत असलेल्या एका व्यक्तीचा पाय आप्ल्यालाल दिसत आहे. दोन्ही फोटोमध्ये त्याच्या पायातील चप्पल वेवेगळी दाखवली आहे आणि शेवटचा फरक आहे जांभळा कुर्ता घातलेल्या मुलाच्या मग एक भिंत दिसत आहे. तिथे लक्ष द्या. पहिल्या फोटोमध्ये तिथे एक माणूस दिसतो आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिथे कोणीही उभं नाही आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !