Headlines

हेयरडायमुळे होणाऱ्या एलर्जीला बरे करण्यासाठी करा हे घरगुती उपचार, तात्काळ मिळेल आराम !

काय तुम्हाला सुद्धा हेअर डाय लावल्यानंतर ऍलर्जीचा सामना करावा लागला आहे ? हे खूपच बेचैनी निर्माण करणारे असते. लोक वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर कलरचा प्रयोग करतात, त्यामुळे त्यांना ऍलर्जीचा सामना सुद्धा करावा लागतो. हेअर कलरचा उपयोग तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करू शकतो. यामुळे केस गळती समस्या, खाज, आग (जलन ) सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. सोबतच यामध्ये उपलब्ध असणाऱ्या रासायनिक घटकांमुळे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हानिकारक ठरू शकते.

कान, हात, चेहरा आणि डोक्यावर एलर्जी या कारणांमुळे लाल चट्टे दिसू लागतात. ही एलर्जी कलर लावल्या नंतर लगेच दिसू लागते किंवा एक दोन दिवसानंतर हळूहळू निर्माण होऊ लागते. तसेच त्वचेला खाज येणे, पांढरे चट्टे उटणे, उन्हात गेल्यानंतर केसाच्या त्वचेमधून पाणी येणे असे प्रकार होतात.

आज आम्ही तुम्हाला हेअर डाय लावल्यानंतर होणाऱ्या एलर्जी पासून संरक्षण मिळण्यासाठी काही घरगुती उपचार याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया त्या बद्दल !

लिंबू आणि दही – लिंबामध्ये अँस्ट्रीनजेंट आणि एंटीसेप्टिक गुणधर्म असतात. जे त्वचेच्या अलर्जीसाठी खूप फायदेशीर आहे. लिंबाच्या रसामध्ये असे गुण उपलब्ध असतात, जे कलरच्या एलर्जी पासून तुमचे संरक्षण करतात. लिंबाच्या रसामध्ये थोडे पाणी मिसळून केसांना लावा किंवा हेअर कलर लावल्यानंतर लिंबू आणि दही मीक्स करून त्वचेवर वर लावा.

जोजोबा तेल – हे तेल डोक्यावर निर्माण झालेले लाल चट्टे किंवा सुजला कमी करू शकते. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या केसांमध्ये जोजोबा तेल चांगल्या पद्धतीने लावून मालिश करा. ते कलरच्या एलर्जी पासून तुमचे संरक्षण करतात.

बेकिंग सोडा – बेकिंग सोडा म्हणजेच आपला खाण्याचा सोडा, हा सहज उपलब्ध होणारा पदार्थ ! बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून एक पेस्ट करा. या पेस्टला डोक्यावरती दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवा, त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. हे मिश्रण कलरच्या एलर्जी पासून तुमचे संरक्षण करतात.

कोरफड जेल – कोरफड जेलमुळे तुम्हाला खाज आणि सुजन पासून आराम मिळेल. ह्या जेलला डोक्यावर लावा. आणि पंधरा मिनिटानंतर स्वच्छ धूवून पाण्याने काढा. कोरफडमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत. जे त्वचेच्या एलर्जी दूर करण्यात खूप मदत करतात.

याचा उपयोग करून आपण सहजपणे खाज सुटणे आणि सूजपासून मुक्त होऊ शकता. याशिवाय आपण केसांमध्ये कोरफड देखील लावू शकता. जर आपल्या त्वचेवर खाज सुटली असेल किंवा पुरळ येत असेल तर आपल्या बोटाच्या सहाय्याने या ठिकाणी कोरफड लावा आणि कमीतकमी 20 मिनिटाने धुवून टाका !

नारळाचे तेल – नारळाच्या तेलामुळे त्वचा कोमल राहते आणि खाज दूर करते.या तेलाला डोक्याला लावा आणि पंधरा मिनिटानंतर धुवून काढा.

तुळशीचे पान आणि लसूण – तुळशी आणि लसुणची पेेस्ट त्वचा एलर्जीसाठी खूप फायदेमंद असते. हि पेस्ट बनवण्यासाठी सुरुवातीला तुळशीच्या काही पानांना घेऊन वाटा. त्यामध्ये एक चमचा तिळाचे तेल, लसणाच्या पाकळ्या, चिमूटभर मीठ आणि काळे मीठ मिसळा नंतर वरचेवर हे मिश्रण लावा, यामुळे तुम्हाला एलर्जी पासून सुटका मिळेल.

फळांचे सिरम – हे खाज, सूज, एलजी इत्यादींना दूर करते म्हणूनच या सिरमला डोक्यावर लावा यामुळे केसांचा रुक्षपणा लवकरच निघून जाईल आणि खाजे पासून तुम्हाला मुक्तता मिळेल.

तिळाचे तेल – हे तेल खाजपासून आराम प्रदान करते. या तेलाला डोक्यावर लावण्याआधी थोडेसे गरम करा. काही दिवसातच त्याच्या प्रयोगाने एलर्जी दूर होईल.

कडुलिंबाची पाने – कडुलिंबाच्या पाल्यामध्ये भरपूर प्रमाणात एंटीबैक्टीरियल गुणधर्म उपलब्ध असतात. या गुणधर्मामुळे तुम्हाला एलर्जी पासून मुक्तता मिळू शकते. कडुनिंबाच्या पानांना सहा ते आठ तास पाण्यामध्ये भिजू द्या आणि नंतर बारीक वाटा. त्यानंतर या पेस्टला त्वचेवर कमीत कमी पंधरा मिनिटे लावून ठेवा. आणि कमीतकमी 20 मिनिटाने धुवून टाका !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.