Headlines

निवृत्त झाल्यानंतर देखील करोडो रुपये कमावतो सचिन तेंडुलकर, जाणून घ्या कसे !

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देव. सचिन फक्त भारतात नव्हे तर जगभरात एक सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्ध आहे. सचिन तेंडुलकरने एक खेळाडू म्हणून असे यश संपादन केले, ज्या यशाची प्रत्येक खेळाडू स्वप्न पाहत असतो. सचिनला क्रिकेट खेळताना बघणं म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असे. सचिनने इंटरनेशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन फार काळ लोटला आहे, तरीही सचिनची क्रेझ मात्र तितकीच आहे. अद्यापदेखील सचिन म्हणजे क्रिकेटचा देव आणि अनेकांचा लाडका क्रिकेटपटू आहे. सचिन इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर देखील सचिनचे उत्पन्न करोडोच्या घरात आहे आणि सचिन हा जगभरातील श्रीमंत खेळाडूंपैकी एक मानला जातो. चला तर मग जाणून घेऊया सचिनच्या संपत्तीबद्दल आणि लाईफस्टाईलबद्दल!

सचिन रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतो – सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये सचिनची मालमत्ता ८३४ कोटी रुपये इतकी होती. सध्या त्यांची संपत्ती सातत्याने वाढत आहे. सचिनला क्रिकेट जगतातून सर्वाधिक संपत्ती मिळाली आहे. याशिवाय, त्याने रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली आहे ज्यातून त्याने भरपूर नफा कमावला. अहवालानुसार, २०२१ मध्ये सचिनची एकूण कमाई सुमारे $ 120 दशलक्ष झाली आहे. त्याचबरोबर निवृत्तीनंतरही सचिनची कमाई सुरूच आहे.

सचिनच्या उत्पन्नाचे मार्ग – सचिन एक प्रसिद्ध खेळाडू असल्याने अनेक जाहिरातींमधून तो आपल्या भेटीला येतं असतो. सचिन जाहिराती, फॅशन, कमर्शियल ब्रँड इत्यादींच्या माध्यमातून उत्पन्न मिळवत असतो. सचिन एडिडास, बीएमडब्ल्यू इंडिया, जिलेट, तोशीबा आणि कोका कोला यासारख्या ब्रँडसोबत जोडला गेला आहे. एका अहवालानुसार, २०११ ते २०१३ दरम्यान सचिनने फक्त कोकाकोलासोबत 1.25 मिलियन डॉलर इतके उत्पन्न मिळवले. याशिवाय निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड दरमहा ५० हजार इतके पेन्शन सचिनला दिले जाते. मुंबईमधील बांद्रा पश्चिम इथे एक घर आहे, ज्याची किंमत ६२ करोड रुपये असल्याचे म्हटले जाते. सोबतच कुलाबा आणि मुलुंड या ठिकाणी देखील सचिनच्या नावे प्रॉपर्टी आहे, ज्याची किंमत करोडोच्या घरात आहे.

सचिनचे कार कलेक्शन – अनेक विविध लग्जरी कार सचिनकडे आहेत. यापैकी काही स्वत: खरेदी केलेल्या आहेत तर काही कार प्रायोजक किंवा चाहत्यांनी भेट दिलेल्या आहेत. सचिनजवळ बीएमडब्ल्यू i8, बीएमडब्ल्यू 750Li एम स्पोर्ट, बीएमडब्ल्यू एक्स 5 एम 50 डी, बीएमडब्ल्यू एम 5, बीएमडब्ल्यू एम 6 ग्रैन कूप, फेरारी 360 मोडेना, मर्सिडीज-बेंज C36 AMG, निसान जीटी-आर, मारुति 800 इत्यादी विविध कार आहेत.

सचिन तेंडुलकरला भारतरत्न हा सर्वोच्च सन्मानही मिळाला आहे. यामुळे त्यांना दरमहा पेन्शन म्हणून आणखी जास्त रक्कम मिळते. सचिनला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत पद्मविभूषण, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडूनही खेळला आहे आणि हल्ली तो आयकॉन म्हणून फ्रँचायझीचा भाग आहे. सचिन फक्त उत्तम क्रिकेटरचं नसून अनेकांचा आदर्श व्यक्ती देखील आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !