खुशखबरी ! शेतकऱ्यांचा आनंद होणार द्विगुणित, ६००० हजार रुपये ऐवजी आता मिळणार वर्षाला १२००० रुपये !

bollyreport
3 Min Read

शेतकऱ्यांसाठी अनेक विविध उपाययोजना आहेत, त्यापैकी एक आहे; पीएम किसान सम्मान निधी योजना. केंद्र सरकारद्वारा शेतकऱ्यांना दिलासा म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊ केली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये देण्यात येतात. परंतु माध्यमांमधून मिळणाऱ्या माहितीनुसार शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत दुपटीने वाढ करणार असल्याची माहिती मिळत आहे. या किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पूर्वी ६००० रुपये मिळत त्याऐवजी त्यांना आता १२००० रुपये दरवर्षी दिले जातील. ही १२००० रुपये रक्कम तीन हफ्त्यांमधून मिळेल.

माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेच्या दुपटीचा खुलासा बिहारचे कृषी मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी केला आहे. बिहारच्या कृषी मंत्रींनीं हल्लीच दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि वित्त मंत्री निर्मला सीतारामण यांची भेट घेतली. ते पाटणामध्ये परत येताच त्यांनी माहिती दिली की पीएम किसान योजनेद्वारा मिळणारी रक्कम दुप्पट करण्यात येणार आहे. ही रक्कम वाढवण्यासाठी केंद्राकडून सर्व तयारी देखील पूर्ण झाली आहे. सरकारच्या या निर्णयाकडे देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची कसरत म्हणून पाहिले जात आहे.

विशेष म्हणजे ९ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा नववा हप्ता जारी केला होता. नवव्या हप्त्यात १९, ५०० कोटी रुपये देशभरातील ९.७५ कोटीहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत १.३८ लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

या योजनेचा लाभ कसा घ्यावा – पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते. आपण घरबसल्या ऑनलाईन देखील याचं रजिस्ट्रेशन करू शकतो. याव्यतिरिक्त पंचायत सचिव किंवा स्थानीय कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारा या योजनेसाठी अप्लाय करता येते.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन
1. प्रथम पीएम किसान योजनेच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जावे. 2. त्यानंतर farmer’s corner मध्ये जावे.
3. त्यातील ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करा. 4. त्यानंतर आधार नंबर द्यावा, सोबतच captcha code टाकत, राज्य कोणते याची निवड करत पुढे जावे. 5. समोरील फॉर्ममध्ये स्वतःची संपूर्ण माहिती भरावी.

6. पुढे बँक अकाउंटविषयी माहिती भरावी. ती माहिती भरताना बँकेचा IFSC code नीट देत तो सेव्ह करावा. 7. पुढे तुमच्या शेतजमिनीविषयी माहिती विचारली जाईल. त्यामध्ये खसरा क्रमांक व खाते क्रमांक भरून ती माहिती सेव्ह करावी.
8. मग फॉर्म सबमिट करावा.

बँकेत रकमेचे हफ्ते कधी येतात?
शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ६००० रुपये ३ हफ्त्यांच्या माध्यमातून जमा केले जातात. ४ महिन्यांनी २००० रुपयांचा हफ्ता येतो. पीएम किसान पोर्टलच्या मते, या योजनेचा पाहिला हफ्ता १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान येतो. दुसरा हफ्ता १ एप्रिल ते ३१ जुलै दरम्यान येतो. तर तिसरा हफ्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.