सुकन्या समृद्धी योजनेमध्ये झाले आहेत हे नवीन महत्वाचे बदल, जाणून घ्या !

240

२०१५ मध्ये केंद्र सरकारने मुलगी वाचवा मुलगी शिकवा हे अभियान सुरु केले. मुलींचे भविष्य उज्वल होण्यासाठी त्या अंतर्गत सुकन्या समृद्धि योजना सुरु करण्यात आली. या योजनेद्वारा तुम्ही तुमच्या मुलीचे शिक्षण किंवा तिच्या लग्नासाठी मोठा फंड घेऊ शकता. या योजनेत मुलीचे आईवडिल किंवा त्यांचे पालनकर्ता एका मुलीच्या नावावर एक खाते उघडु शकतात. तर दोन मुली असतील तर त्यांची दोन वेगवेगळी खाती उघडता येतात.

ही योजना देखील इतर बॅंकेत जमा केल्या जाणाऱ्या पैशांप्रमाणेच आहे. यात सुद्धा जमा पैशांवर सरकार द्वारे घोषित केलेले व्याज मिळते. तुमच्या घरात सुद्धा मुलगी असल्यास तुम्ही पण तिच्या नावाने खाते उघडु शकता. मात्र या योजनेत आता काही बदल देखील करण्यात आले आहेत. चला तर जाणुन घेऊ काय आहेत ते बदल !

तिसऱ्या मुली साठी सुद्धा खाते उघडता येऊ शकते – पहिले या योजनेत केवळ दोन मुलींसाठी खाते उघडता येऊ शकत होते. त्यामुळे तीन मुली असल्यास तिसरीला या योजनेचा फायदा मिळायचा नाही. पण नव्या नियमांनुसार एका मुली नंतर दोन जुळ्या मुली होतात तर त्या दोघांसाठी सुद्धा खाते उघडले जाऊ शकते.

डिफॉल्ट अकाउंटवर व्याज दर बदलणार नाही – नवीन नियम अंतर्गत जर सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही कारणास्तव डिफॉल्ट मानले गेले आणि पुन्हा एक्टिव केले नाही, तरी देखील जमा रक्कमेवर लागू दराने व्याज मिळेल.

वेळ आधी देखील खाते बंद करू शकता – पुर्वी या योजनेच्या अंतर्गत असलेले खाते फक्त दोन कारणास्तव बंद केले जाऊ शकत होते. पहिले म्हणजे मुलीचा मृत्यु झाल्यावर आणि दुसरे म्हणजे मुलीचा राहता पत्ता बदलल्यास . पण आता नवीन नियमांअर्गत यात आता जीवघेणा आजार हे कारण सुद्धा समाविष्ठ केले आहे. तसेच जो व्यक्ती हे खाते चालवतो त्याचा मृत्यु झाल्यास ते खाते वेळे आधी बंद केले जाऊ शकते.

मुलगी स्वता सुद्धा चालवु शकते खाते – पुर्वीच्या नियमांनुसार खाते चालु केल्यानंतर १० वर्षांनी मुलगी ते खाते चालवु शकत होती. पण आता १८ वयोवर्षांपुर्वी मुलगी ते खाते ऑपरेट करु शकणार नाही. तो पर्यंत तिचे गार्डियनच ते खाते चालवु शकतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !