Headlines

लग्नासाठी जर तुम्हाला अशी मुलगी मिळाली तर तुमचं आयुष्य स्वर्गसुखापेक्षा कमी नसेल, जाणून घ्या !

लग्न ही एक अशी गोष्ट आहे जी केलं तरी किंवा नाही केले तरीही माणुस पस्तावतो. विशेषता मुलांच्या मनात त्यांना लग्नासाठी कशी मुलगी हवी हा प्रश्न हमखास येतो. पण मुलींचे मात्र थोडे वेगळे असते. त्यांना लग्नासाठी कसा मुलगा हवा हे त्यांनी आधीच ठरवलेले असते. पण मुलगे मात्र त्यांच्यासाठी योग्य मुलगी शोधताना थोडे कन्फ्युज असतात. आज आम्ही तुम्हाला याचसाठी मदत करणार आहोत.

अशा मुलीसोबत करावे लग्न – १. आजकालच्या मुलींना घरगुती कामे करायला आवडत नाही. पुढे तुम्ही भले ही घरकामासाठी माणसे ठेवली. तरी एक वेळ अशी येतेच जेव्हा तुम्हीला तुमच्या घराची जबाबदारी घ्यावी लागते. त्यामुळे लग्नासाठी अशी मुलगी शोधा जी कामाच्या बाबतीत आळशी असणार नाही. २. इज्जत ही पैशांपेक्षा लाखमोलाची गोष्ट आहे. त्यामुळे जी मुलगी घरातल्या सर्व लहान मोठ्या व्यक्तींचा आदर करते, त्यांचा सन्मान करते अशीच मुलगी लग्नासाठी शोधा.

३. मुली म्हटल्या की खर्च हा आलाच. त्यामुळे लग्नानंतर मुलीने तिचा व घराचा अशा दोन्ही खर्चात समन्वय राखला पाहिजे. जास्त खर्च करणारी तसेच परिवाराला सोबत घेऊन न जाणारी मुलगी लग्नानंतर धोका ठरु शकते. ४. मुलीमध्ये घमेंड असता कामा नये. तिची ही घमेंड पुढे जाऊन घरच्यांसाठी क्लेशकारक होऊ शकते. भविष्यात त्यामुळे भांडणे देखील होऊ शकतात. त्यामुळे ज्या मुलीचे पाय सदैव जमीनीवर असतात अशाच मुलीशी लग्नगाठ बांधवी.

५. जी मुलगी तुमच्याशी लग्न करायला तयार असेल अशाच मुलीशी लग्न करावे. ज्या मुली केवळ त्याच्या आईवड़िलाच्या हट्टा पायी लग्नासाठी तयार झाल्यात अशा मुलींपासुन लांबच रहा. त्यांच्याशी लग्न झाल्यास पुढे तुंमचे आयुष्य बरबाद होऊ शकते. ६. मुलीमध्ये कधीही संघर्ष करण्याची किंवा समोर आलेले दुख झेलण्याची ताकद असली पाहिजे. कुठलीही वेळ नेहमी चांगली असेलच असे नाही. त्यामुळे कोणत्याही संकटसमयी त्या मुलीने तुमची साथ सोडायला नको.

७. स्वप्न पाहणे वाईट नाही मात्र इच्छांची यादी संपतच नाही असे व्हायला नको. त्या पुर्ण करण्याच्या नादात मुलीच्या हातुन काही वाईट साईट घडायला नको. त्यामुळे मुलगी शोधाताना ती जास्त डीमांड करणारी तर नाही ना हे नीट तपासा.
८. घराची सून ही त्या घराची शान असते. त्यामुळे त्या मुलीचा व्यवहार आणि बोलणे सुद्धा नीट तपासा. अपशब्द आणि सतत नकारात्मक बोलणाऱ्या मुलीपासुन लांब रहा. कधीही गोड वाणी असलेल्या मुलीशी लग्न करा.

९. मुलीमध्ये संयम असला पाहिजे. जर तिला कोणत्याही गोष्टीवर लगेच राग येत असेल तर ती तिच्या सासरी नीट मिसळु शकत नाही. तिला प्रत्येक गोष्ट संयम आणि प्रेमाने हाताळता आली पाहिजे. १०. मुलीचे व तुमचे विचार एकमेकांशी मिळताजुळतात का हे नीट तपासा. अनेकदा वेगवेगळे विचार असल्यास व्यक्ती अॅडजस्ट होऊ शकत नाही. पण मुलीला जर दुसऱ्याच्या विचाराप्रति सन्मान असेल तर ती नक्कीच अॅडजस्ट होऊ शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !