Headlines

मरणाच्या काही मिनिट आधी माणूस या गोष्टीचा विचार करतो, शास्त्रणांनी लावला शोध, जाणून घ्या !

मरण ही अशी एक गोष्ट आहे ज्याचे रहस्य आजतायगत उलगडलेले नाही. वेगवेगळे वैज्ञानिक यावर रिसर्च करत असतात. मरणानंतर ती व्यक्ती कुठे जाते. तिचे काय होते. याबाबत अनेक प्रश्न वैज्ञानिकांसह सर्वसामान्य माणसांना देखील पडलेला असतो. पण मरणाच्या काही क्षण आधी त्या व्यक्तीच्या मनात काय़ चालु असेल असा विचार कोणाच्या मनात आला आहे का. या प्रश्नाचे उत्तर नुकतेच काही वैज्ञानिकांनी शोधुन काढले आहे.

मरणाच्या काही क्षण आधी त्या व्यक्तीच्या मनात हे चालु असते – वैज्ञानिकांच्या मते माणुस हा त्याच्या शेवटच्या क्षणात त्याने त्याच्य़ा आयुष्यात घालवलेले चांगले क्षण आठवतो. याबाबतचा खुलासा एका ८७ वर्षाच्या व्यक्तीच्या मृत्यु नंतर झाला. वास्तविक या व्यक्तीला अ*प*स्मा*राचे झटके येत होते.. त्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. त्यावेळी त्याच्या उपचारादरम्यान इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राम झाले. त्याचदरम्यान त्याला हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यु झाला. पण या डायग्नोस्टिक टेस्टमुळे नकळत त्या व्यक्तीच्या मेंदुची ब्रेन मैपिंग झाली. त्यात त्याचे मरणापुर्वीच्या १५ मिनिटांचे विचार रेकॉर्ड करण्यात आले.

त्यात त्यांना तो व्यक्ती त्याच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या आठवणींना उजाळा देत असल्याचे आढळले. इइजी मध्ये झालेल्या या रेकॉर्डींग मध्ये मरणापुर्वीच्या ३० सेकंदात त्याचे हार्ट बीट फारच जलद गतीने होत होते. त्यावेळी वैज्ञानिकांनी एक युनिक वेव्ह कप्चर केली. त्या वेव्हचे नाव Gamma Oscillations असे आहे.

हा शोध लुइसविले जेमर विश्वविद्यालय च्या न्यूरोसर्जन डॉ. अजमल जेमर यांनी लावला. त्यांनी सांगितले की आय़ुष्य़ाच्या शेवटच्या घटकेत आपला मेंदु स्वप्न बघण्याच्या स्थितीत जातो. तेव्हा शरीरात प्राण राहत नाही. मात्र मेंदु शेवटच्या वेळी जलद गतीने काम करत असतो.

या बाबतीत भारतीय डॉक्टरांचे मत – न्यूरो एंड पेन केयर क्लीनिक गुडगांव च्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. भुपेश कुमार यांनी यावर स्वताचे मत मांडले. ते म्हणाले की जेव्हा व्यक्ती मरतो तेव्हा त्याच्या गामा वेव, बीटा वेव अधिक सक्रिय होतात. त्यामुळे ती व्यक्ती एंग्जायटी मोड मध्ये जातो. यानंतर अल्फा, थीटा वेव्हसुद्धा अॅक्टीव्ह होतात. जेव्हा व्यक्तीची डेल्टा वेव एक्टिव होते तेव्हा व्यक्ती गाढ झोपेत जातो. शिवाय त्या व्यक्तीची गामा वेव्ह ही अधिक अॅक्टिव्ह असल्यामुळे तो त्याच्या चांगल्या आठवणीत रमतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !